महाराष्ट्र बातम्या

Dhananjay Munde : बहिणीच्या मदतीला भाऊ धावला; वैद्यनाथ कारखाना वाचवण्यासाठी सांगितली 'ही' आयडिया

संतोष कानडे

मुंबईः राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे हे बहीण-भाऊ असले तरी राजकीयदृष्ट्या विरोधक आहेत. २०१९मध्ये धनंजय यांनी पंकजांचा परळीमधून पराभव केला होता.

असं असलं तरी वैद्यनाथ कारखान्याच्या निमित्ताने या बहीण-भावामधला संवाद वाढताना दिसून येत आहे. परळीतला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने 6 महिन्यांपूर्वी छापेमारी करून काही कागदपत्रे तपासले होते. या तपासणीमध्ये कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथील जीएसटी आयुक्तालयाने या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देतांना पंकजा मुंडे यांना शक्य तेवढी मदत करणार असल्याचं म्हटलं होतं.

त्याबद्दल धनंजय मुंडे यांनी आज (रविवारी) स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, विषय कारखान्याच्या जीएसटीचा आहे. हा कारखाना पंकजाताई बघतात. कारखाना टिकला पाहिजे, उभा राहिला पाहिजे यासाठी लोकवर्गणी करण्याचा विचार आहे. वर्गणी जमा करुन जीएसटी भरण्यात येईल, असं धनंजय मुंडे म्हणाले,

मंत्री मुंडे पुढे म्हणाले की, कारखाना टिकवण्यासाठी व्यवस्थित नियोजन करुन पुढचा विचार करु. राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबद्दल त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह हे आमच्याकडे राहणार आहे. प्रफुल्ल पटेल हे आमचे नेते आहेत. तर अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT