Bageshwar Dham Baba Dhirendra Shastri esakal
महाराष्ट्र बातम्या

Dhirendra Maharaj: धीरेंद्र शास्त्रींना महाराष्ट्रात बंदी? नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दिव्यशक्तीच्या दाव्याद्वारे धीरेंद्र शास्त्री अंधश्रद्धा पसरवत जनतेची दिशाभूल करत असल्याचा असा आरोप त्यांच्यावर होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पत्र लिहिलं आहे. १८ आणि १९ मार्च रोजी धीरेंद्र शास्त्री मुंबईत कार्यक्रम होणार आहे. (Dhirendra Shastri may banned in Maharashtra Nana Patole letter to CM Eknath Shinde)

धीरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथील कार्यक्रमाला परवानगी दिल्यास जनतेची दिशाभूल करून त्यांच्या भावनांशी, श्रद्धेशी खेळ मांडला जाऊ शकतो, अशी भीती पटोले यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी असंही म्हटलंय की, महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे. अंधश्रद्धेला आपल्या राज्यात आजिबात थारा नाही. महाराष्ट्रातनं तसा कायदाही केला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या तसेच संत तुकाराम महाराज यांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शात्रींना महाराष्ट्रात कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणीही पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.

हे ही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

धीरेंद्र महाराजांच्या नागपूरमध्ये आयोजित दिव्य दरबार कार्यक्रमावरुन बराच गदारोळ माजला होता. दिव्यशक्तीचा दावा करणं ही दिशाभूल असून शास्त्रींनी दिव्य चमत्कार करुनच दाखवावा असं थेट आव्हान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दिला होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT