Dilip Walse-Patil टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

'आरोपी म्हणून फडणवीसांना नोटीस नाही; भाजपनं दंगा करायचं कारण नाही'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: पोलीस बदली अहवाल लीक प्रकरण आणि देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत माहिती दिली आहे. मुंबई पोलीस एसआयटी मधून हा डाटा बाहेर कसा गेला आणि त्याला जबाबदार कोण याची चौकशी करणार आहेत. मुंबई मध्ये सायबर सेल मध्ये गुन्हा रजिस्टर झाला तो 2021 मध्ये... आणि डेटा बाहेर कसा गेला हा विषय आहे याची चौकशी सुरु आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार हा गुन्हा दाखला झाला आहे. आतापर्यंत 24 साक्षीदार यांची साक्ष घेतली आहे.

यावेळी दिलीप वळसे पाटलांनी म्हटलंय की, गुप्त माहिती बाहेर पसरवण्यात आली. त्यासंदर्भात फडणवीसांचा जबाब नोंदवण्यात काही गैर नाही. राज्य विभागाची गुप्त माहिती बाहेर पसरवल्याबाबत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती बाहेर कशी गेली हा विषय आहे. ही माहिती प्रसिद्ध करायची कि नाही करायची हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, चौकशी झाली म्हणून भाजपला दंगा करण्याचं काही कारण नाही. फडणवीसांना समन्स पाठवलेलं नाहीये. आज त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब घेण्यात आला आणि यात गैर काहीच नाही. यासंदर्भात उगाच गोंधळ करण्याची गरज नाही. त्यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवलेली नाही. फडणवीस यांना तो डेटा कुठून मिळाला हे तपासलं जातंय.

देवेंद्र फडणवीसांची तापसभर चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी म्हटलंय की, गुप्त माहिती बाहेर पसरवण्यात आली आहे. त्यासंदर्भात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीच फडणवीसांना पाच-सहावेळा नोटीस पाठवली होती. मात्र, ही नोटीस म्हणजे समन्स नाहीये. गुप्त माहिती बाहेर पसरवण्यात आली आहे. राज्य विभागाची माहिती बाहेर गेल्यानं गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत थंडी गायब, 'ऑक्टोबर हिट' चा चटका वाढला, आज राज्यातील 'या' भागांत पावसाचा इशारा

Devgad Hapus Mango : फळांचा राजा आला बाजारात; दिवाळीत 'देवगड' हापूसची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update : राज्यभरात दीपोत्सवाचा चैतन्यसोहळा; आज घरोघरी होणार लक्ष्मीपूजन

Panchang 21 October 2025: आजच्या दिवशी तीळ किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

MLA Rohit Pawar: सरकारला तुकोबांनी सुबुद्धी द्यावी : आमदार रोहित पवार; संजय शिरसाट यांच्याबाबत नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT