Dilip Walse Patil Dilip Walse Patil
महाराष्ट्र बातम्या

गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीच्या आरोपांवर गृहमंत्री म्हणाले…

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे आध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांकडून या प्रकरणाचा निषेध केला जात आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना भडकावल्याच्या ठपका ठेवत कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची कोठडी सूनावण्यात आली आहे.

दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी यांच्याकडून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत, त्यांनी जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला होता. दरम्यान या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सतत असा आरोप करत आहे की गृहखातं जाणून बुजून हे करत आहे, आमच्या जिवाला धोका आहे. शरद पवार आणि तुमचं नाव घेत आहेत असे विचारले असता, वळसे पाटील म्हणाले की, त्यांनी काय आरोप करावा हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्या असंच अंदाजपचे काहीतरी शरद पवार आणि माझ्यावर आरोप करतायत, त्यांना अशी सवय आहे तक्रारी आरोप करुन लोकांच्या समोर राहण्याचा प्रयत्न करायचा, त्यांचे सगळे आरोप मी फेटाळून लावतो" असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.

काल कायदा सुव्यवस्थेत ज्या त्रुटी दिसून आल्या त्याला जबाबदार असलेल्या सर्वांवर कारवाई होईल असे त्यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांनी आता सहकार्य करावे. कर्मचाऱ्यांनी शांतता ठेवावी, राज्य सरकारने अधीच भूमिका स्पष्ट केली आहे, विलगीकरणाची मागणी सोडता सगळ्या मागण्या पुर्ण केल्या आहेत. त्यामुळे कोणाच्यातरी भडकावण्यावर विश्वास ठेवू नये. तपास करुन पुढची कारवाई केली जाईल, असे देखील वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District Bank Recruitment: पुणे जिल्हा बँक क्लार्क भरतीत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; गुणपत्रक न जाहीर केल्याने उमेदवार संतप्त

फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६ ची नामांकनं जाहीर! 'दशावतार', 'गोंधळ' आणि 'आता थांबायचा नाय!' चा डंका; पाहा सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रींची यादी

Fulambri Governance : लोकांची अडवणूक थांबवा, कामे वेळेत पूर्ण करा : आमदार सुहास शिरसाठ यांचे फुलंब्रीतील अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Farmer Accident Insurance: मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघात विमायोजना लवकरच सुरू : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Mahabaleshwar Kelghar Ghat : केळघर घाटातील काळाकडा येथे दरड हटली, जेसीबी बाहेर; भूस्खलनाचा धोका कायम, रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद

SCROLL FOR NEXT