Dipali Sayyed esakal
महाराष्ट्र बातम्या

Dipali Sayyed: दीपाली सय्यद स्वार्थासाठी पक्षांतर करतात का? अभिनेत्री म्हणाल्या...

दीपाली सय्यद यांनी यू-टर्न घेत शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला होता.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची बाजू आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद यांनी अलीकडे यू-टर्न घेत शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला होता. अद्याप प्रवेश झाला नसला तरी त्या शिंदे गटात जाणार हे निश्चित असल्याचे बोलले जाते. दरम्यान, सरकारनामाच्या बहुचर्चित Open Mic Season 2 मध्ये सहभागी झालेल्या सय्यद यांना थेट स्वार्थासाठी पक्षांतर करता का? असा सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाल्या दीपाली सय्यद?

अजिबात नाही. मी शिवसेनेत मनापासून काम केलं आहे. मी शिवसेनेत आले. शिवसेनेसाठी लढले. पण ज्यांनी मला घेऊन आले त्यांच्यासोबत राहणं हे माझं कर्तव्य आहे. आता माझी अशी अवस्था होते की आपण इथे जायचं की तिथं. मग ज्यांनी आपल्याला आणलं आहे. त्याच्याबरोब राहून काम करायचं हे कुठलाही कार्यकर्ता मी स्वतःला कार्यकर्त समजते. आणि मी त्या पद्धतीने काम करते.

तसेच राजकारणात अभिनय करावा लागतो का? असं विचारंल असता, त्यांनी हसून उत्तर दिलं. कधी कधी काय होतं, अशा ठिकाणी आपण असतो की, आपल्याला काही माहिती नसतं. आणि अचानक बोलावं लागतं. किंवा ती करावी लागते. मागचं पुढचं काहीच ठाऊक नसतं मग तेव्हा आतल्या कलाकारला जागावं लागतं. मग कलाकार अभिनय करतो. त्यामुळे राजकारणात अभिनय असल्याचा फायदा होतो.

काही आठवड्यांपूर्वी, दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात जाणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी दिपाली सय्यद यांनी संजय राऊत आणि रश्मी ठाकरे यांच्यावर थेट हल्ला करत आगामी वाटचालीचे संकेत दिले. मी एवढंच सांगेन की, संजय राऊत यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय राऊत आहेत. त्यांच्यामुळे शिवसेनेते दोन गट पडले. शिंदे साहेबांनी मला शिवसेनेत आणले होते. त्यामुळे सद्यपरिस्थितीत शिंदे साहेबांसोबत उभे राहणे, हे माझे कर्तव्य असल्याचे दीपाली सय्यद यांनी म्हटले होते.

यावेळी दीपाली सय्यद यांनी आश्चर्यकारकरित्या रश्मी ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. मुंबई महानगरपालिकेतून येणारे खोके बंद झाले, याची खंत रश्मी ठाकरे यांना आहे. नीलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या चिल्लर नेत्या आहेत. या सगळ्यातील महत्त्वाच्या सूत्रधार या रश्मी ठाकरे या आहेत, अशी टीकाही दीपाली सय्यद यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

SCROLL FOR NEXT