Dipali Sayyed Esakal
महाराष्ट्र बातम्या

Dipali Sayyed: "मातोश्रीवरचे खोके.. " पक्ष प्रवेशाच्या घोषणेवेळी दीपाली सय्यदचे रश्मी ठाकरेंवर मोठे आरोप

अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पक्षप्रवेश करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पक्षप्रवेश करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्या जात आहेत. येत्या 3 दिवसात अभिनेत्री दीपली सय्यद पक्षात प्रवेश करणार आहेत. त्या बोलताना म्हणाल्या की, मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती घेण्यासाठी मी तयार आहे असंही सय्यद यांनी सांगितलं आहे.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, मला शिंदे साहेबांनी पक्षात आणलं होतं त्यामुळे मी पक्षात प्रवेश करत आहे. दरम्यान बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांना जी शिक्षा झाली आहे ती त्यांच्या पापाची शिक्षा आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं संजय राऊत उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्यामुळे पक्ष फुटला असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मला शिंदे यांनी सेनेत आणलं होतं त्यामुळं आता मी त्यांच्यासोबत उभं राहणं माझ कर्तव्य आहे असंही त्या म्हणाल्या आहेत.

पुढे त्या म्हणाल्या की, मुंबई महापालिकेतील खोके मातोश्रीवर येणं बंद झाल्यामुळे रश्मी ठाकरे यांना खंत वाटत आहे. त्याचबरोबर नीलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या सर्व चिल्लर आहेत. या सगळ्यांचा सूत्रधार आहे तो म्हणजे रश्मी वाहिनी आहेत असंही त्या म्हणाल्यात.

मोठ्या पातळीवर वाद होतो तेव्हा अशा खोक्याच्या गोष्टी बाहेर येतात. खोके कोण घेतं ते सर्वांना समजलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला महत्व मिळालं पाहिजे. रश्मी ठाकरे या महानगरपालिकेतील मुख्य सूत्रधार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. बोलताना त्यांनी रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

Maratha Reservation News : गणेशोत्सवात जरांगे पाटलांनी उपोषण टाळावे

Sangameshwar News : २२ वर्षीय इंजिनिअरचा खाडीत बुडून मृत्यू, गणेशोत्सवासाठी मुंबईहून आलेला गावी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT