Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: शिंदे-फडणवीस अन् अमित शाहंच्या बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा! लवकरच...

Sandip Kapde

Maratha Reservation: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी राज्यभर आंदोलने करण्यात आली. तर आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले होते. मात्र सरकारने एक महिन्याचा वेळ मागितल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान आरक्षणासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

गायकवाड आयोगाच्या १ हजार पानांचं ट्रान्सलेशन झालं नाही. तज्ज्ञांशी चर्चा करून क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केली जाणार आहे. लवकरच सुप्रीम कोर्टात पिटीशन दाखल केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

मराठ्यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. मराठा आंदोलकांनी राज्य सरकारला दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. यासाठी आंदोलकांकडून राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाचा लढा राज्यात अनेक दिवसांपासून लढला जात आहे. मराठ्यांना पुन्हा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आरक्षण दिले देखील होते. मात्र २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय घटनाबाह्य ठरवत रद्द केला होता. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात मराठा समाजाला आरक्षणासाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित करण्याचा कोणताही आधार नसल्याचे म्हटले होते. (Maratha Reservation News)
 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण हे संविधानात बसणारे नाही असं म्हटंल आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ठरवणाऱ्या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची गरज नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. मराठा आरक्षण हे ५० टक्के आरक्षण मर्यादेचं उल्लंघन आहे. मराठा आरक्षण देताना ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वैध कारण नाही असं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT