महाराष्ट्र बातम्या

रिक्षा, टॅक्‍सीच्या दर्शनी भागात "डिस्प्ले बोर्ड' ! 

सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई - जवळचे भाडे असल्यास "वेटिंगवर आहे' असे सांगत ते नाकारणे, "इंधन संपले आहे', असे खोटे सांगणाऱ्या रिक्षा, टॅक्‍सीचालकांच्या बनवेगिरीला चाप बसणार आहे. रिक्षा, टॅक्‍सीच्या दर्शनी भागात "उपलब्ध आहे (हिरवा रंग), "उपलब्ध नाही (लाल रंग)' आणि "बंद (पांढरा रंग) याचा दर्शनी फलक (डिस्प्ले बोर्ड) लवकरच लावण्यात येणार आहे. याविषयी परिवहन विभागात बैठकांचे सत्र पार पाडले असून, याबाबत कार्यवाही होणार आहे. या फलकामुळे प्रवासी आणि चालक यांच्यातील वादावादीची प्रकरणे जवळपास मिटणार आहेत. यामुळे सुखाचा प्रवास होणार आहे. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या शहरांत रिक्षाचालकांची मनमानी असते. त्यामुळे जवळचे भाडे नाकारले जाते. तसेच प्रवशांना वेठीस धरले जाते. गॅस संपला असल्याचे कारण पुढे करीत प्रवशांना सेवा देण्यात टाळाटाळ करणे. यातून अनेक तक्रारी चालक आणि प्रवासी यांच्यात होत असतात. यावर तोडगा काढण्यासाठी हकीम समितीने काही शिफारशी केल्या होत्या. यानुसार रिक्षा आणि टॅक्‍सीच्या दर्शनी भागात याबाबतचा फलक लावण्याची शिफारस परिवहन विभागाने अंमलात आणण्याचे मनावर घेतले आहे. याबाबत मंत्रालयात परिवहन विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. यावर साधकबाधक चर्चा केली जात असून, लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

कशारीतीने फलक बसविला जाणार? 
टॅक्‍सी अथवा रिक्षाच्या दर्शनी भागात मीटर बॉक्‍सप्रमाणे सद्य-स्थिती दर्शविणारा बोर्ड लावण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॅफिक सिग्नलप्रमाणे तीन रंगाचे निर्देश असतील. या बोर्डवर हिरव्या रंगाचे इंडिकेटर दिसत असेल, तर प्रवासासाठी वाहन उपलब्ध आहे. प्रवासी बसू शकतात, असे समजले जाईल. लाल रंगाचा इंडिकेटर असेल, तर आतमध्ये प्रवासी आहे, त्यामुळे उपलब्ध नाही. तसेच पांढरा रंग असेल, तर अन्य कारणामुळे प्रवासी सेवा देता येणार नाही, असा उल्लेख होईल. यामध्ये इंधन संपले आहे. वाहन नादुरस्त आहे आदी कारणांचा समावेश आहे. 

आकडेवारी 
- टॅक्‍सीची संख्या- 84 हजार 
- मुंबईतील टॅक्‍सी- 57 हजार 595 
- राज्यातील रिक्षा- 8 लाख 37 हजार 
- मुंबईतील रिक्षा- 1 लाख 69 हजार 659 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : भारतीय संघात परतला अन् Rinku Singh सूसाट सुटला... १५ चेंडूंत ६८ धावांसह ठोकले वादळी शतक

Kalyan News: धक्कादायक! १७व्या मजल्यावर क्रेन कोसळून मोठी दुर्घटना; एका मजुराचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

त्यांचं शरीर साथ देत नव्हतं... कसे होते इरफान खान यांचे शेवटचे दिवस; डिझायनर म्हणाली, 'कॅन्सर झाल्यानंतर त्यांनी कधीही....

थरारक प्रसंग! आंबेनळी घाटात कार थेट 100 फूट दरीत कोसळली; 10 वर्षांच्या मुलाच्या कॉलमुळे वाचले पाच जणांचे प्राण

Kolhapur Muncipal : महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा; समन्वय ठेवा, नाराजांची समजूत काढा – रविंद्र चव्हाण

SCROLL FOR NEXT