Rahul Gandhi and Yashomati Thakur  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi : भाजपचा अन् नथुराम गोडसे यांचा DNA एकच; यशोमती ठाकूर यांची टीका

DNA of BJP and Nathuram Godse is same: यशोमती ठाकूर यांची टीका

रवींद्र देशमुख

अमरावती- भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये वाद-प्रतिवाद वाढला आहे. भाजपने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. यात राहुल यांना रावणाच्या रुपात दाखवण्यात आलं होतं. याच मुद्द्यावरुन काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजरवर टीका केली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, भाजपचा डीएनए आणि नथुराम गोडसे यांचा डीएनए एकच आहे. नथुराम गोडसे यांनी पण महात्मा गांधींना रावणाचं रूप दिलं होतं, आणि स्वतः महात्मा गांधीना मारायचा प्रयत्न केला. संघ आणि भाजप सतत तेच करत असतात.

दरम्यान गांधी त्या युगातले असो या युगातले असो गांधी गांधी आहे. या देशाचा मूळ डीएनए गांधी आहे. कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी गांधी मरत नसतात. जी काही विकृती आहे, ती विकृती सत्ताधाऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे. ती विकृती नष्ट झाली पाहिजे. यासाठी येत्या दसऱ्याला त्याचं दहन झालं पाहिजे, असा आमचा अट्टाहास, असल्याचही ठाकूर यांनी म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी

निवडणूक आयोग निष्पक्ष राहील असं वाटत नाही. निवडणूक आयोग प्रेशरमध्ये काम करत आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली. त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी आहे आणि तोच खरा पक्ष आहे. दरम्यान भाजप निवडणुकीच्या आधी काय गोंधळ घालतील व विभाजन करतील हे सांगता येत नाही, असा दावाही ठाकूर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT