rahul gandhi 
महाराष्ट्र बातम्या

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Rahul Gandhi Video: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. त्यातच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ ट्रेंड होत आहे. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असा दावा काही नेटकरी करत आहेत.

राहुल गांधी पुण्यातील सभेसाठी आले होते. यावेळी काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. अशावेळी राहुल गांधी यांना शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात येते. राहुल गांधी यांनी मूर्तीचा उचित सन्मान केला नाही असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे.

'एक्स'वर अनेकांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जास्त करुन भाजपशी संबंधित नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर करणाऱ्या नेत्यांना तुम्ही निवडून देणार का? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. याशिवाय राहुल गांधी यांच्यावर कडवट टीका देखील केली आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, राहुल गांधी यांना शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देण्यात येते. याचवेळी रविंद्र धंगेकर त्यांच्याशी बोलत असतात. राहुल गांधी मूर्ती दुसरीकडे ठेवण्यास सांगतात. या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलं जाण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी पुण्यात सभा घेतली होती. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT