सोलापूर : महा-डीबीटी पोर्टलवरील संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लावगड योजना २०२२-२३ अंतर्गत अर्ज करावेत. त्यासाठी आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण बंधनकारक असणार आहे. ठिबक सिंचनासाठी देखील ऑनलाइन संकेतस्थळावरून अर्ज करता येतील. ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडून त्यात आवश्यक ती माहिती भरावी. सोलापूर जिल्ह्यासाठी योजनेतून पाच कोटी ८७ लाख ७२ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातून जवळपास ५०० ते ६०० हेक्टरवर फळबाग लागवड होईल.
अर्जदार शेतकऱ्याने पहिल्यांदा वापरकर्त्याचे नाव (युजर नेम) व संकेतशब्द (पासवर्ड) तयार करावा. तसे खाते उघडल्यानंतर अर्ज करण्यासंदर्भात ‘युजर मॅन्युअल’द्वारे सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अर्ज सादर करताना शेतकऱ्यांनी २० रुपयांचे शुल्क व ३.६० रुपयांची जीएसटी, असे एकूण २३.६० रुपये ऑनलान भरायचे आहेत. त्यानंतर महा-डीबीटी महामंडळाकडे शेतकऱ्यांचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी जातो. अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती पुन्हा एकदा पडताळून पहायला हवी. अर्जदार शेतकऱ्याने अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार पूर्वसंमती रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहणार असल्याने अर्जातील माहिती अचूक असावी. या योजेनेअंतर्गत एकूण १६ बहुवार्षिक फळपिकांना अनुदान दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबरअखेरपर्यंत अर्ज करणे अपेक्षित आहे.
ही कागदपत्रे लागतील
सातबारा उतारा
आठ-अ
आधारकार्ड
आधारलिंक बॅंक खाते क्रमांक
माती परीक्षण अहवाल (लिंबूवर्गीय फळपिकांसाठी).
योजनेबद्दल थोडसं...
वैयक्तिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळतो, संयुक्त उतारा असल्यास संमतीपत्राचे बंधन
किमान २० गुंठे ते १५ एकरापर्यंत क्षेत्रधारक शेतकऱ्यांना घेता येईल योजनेचा लाभ
क्षेत्राच्या मर्यादेत शेतकरी एकापेक्षा अधिक फळपिके लागवड करू शकतो
राज्य रोजगार कमी योजनेअंतर्गत दोन हेक्टरपर्यंत लाभ घेतला असल्यास उर्वरित क्षेत्रासाठी लाभ घेता येईल
आंबा, डाळिंब, चिकू, पेरू, काजू, लिंबू, मोसंबी, संत्रा, नारळ, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस व अंजिर पिकांचा समावेश
फळपिकानुसार हेक्टरी अनुदान मिळते; लाभार्थी निवड ऑनलाइन लॉटरी पध्दतीने केली जाते
३० नोव्हेंबरपर्यत अर्ज करण्याची मुदत
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी दरवर्षी अनुदान दिले जाते. राज्यात फळबागांचे क्षेत्र वाढावे, शेतकरी सक्षम व्हावा या हेतूने ही योजना दरवर्षी राबविली जाते. आता त्यासाठी अर्ज करण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा ऑनलाइन पध्दतीने http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.