महाराष्ट्र बातम्या

'मुख्यमंत्री साहेब, आम्हाला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या'

राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : राज्याच्या भरारी पथकातील (Doctor flying squad) मानसेवी वैद्यकीय अधिकारी (Health Officers) स्थायी (Permanent Position) होणार म्हणून कमी मानधनात दिवसरात्र अतिदुर्गम भागात सेवा देत आहेत. मात्र त्यांच्या मागणीला अद्यापही यश मिळाले नाही. मानधनवाढीचा महत्त्वपूर्ण निर्णय १६ सप्टेंबर रोजी शासनाने घेतला होता. मात्र अद्यापही हा निर्णय शासनदरबारी धूळखात पडून आहे. त्यामुळे आता डॉक्टरांनी आश्वासन नको, स्थायी करण्याचा निर्णय घ्या, अन्यथा सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी मुख्यमत्र्यांकडे (CM Uddhav Thackeray) केली आहे. (Doctors in flying squad seeking permission to end life to CM)

राज्यातील संपूर्ण आदिवासी जिल्ह्यात नवसंजीवनी योजनेअंतर्गत २८२ डॉक्टर कार्यरत आहेत. ज्यामध्ये २२ डॉक्टर मेळघाटातील आहेत. राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्याच्या आदिवासी भागात नवसंजीवनी योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात. सोबतच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात.

विशेष म्हणजे, हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागातील जवळपास आठ ते दहा गावांना सेवा देतात. ते बाह्य रुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रांना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करीत असतात.

कोविडच्या संकटात आरोग्यसेवेसाठी डॉक्टर बहुमोल योगदान देत आहेत. असे असतानाही त्यांच्या मानधनवाढीचा निर्णय लागू करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आता राज्यातील डॉक्टरांनी आश्वासन नको, स्थायीचा निर्णय घ्या, अन्यथा सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

कित्येक वर्षांनंतर राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चाळीस हजार मानधन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. डॉक्टरांचा अंत ना पाहता या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करावी, अन्यथा आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
- डॉ. विशाल देशमुख, भरारी पथक, मेळघाट.
कोरोनाच्या संकटात कोणतेही लाभ मिळत नसताना भरारी डॉक्टर कोविड सेंटरवर सेवा देत आहेत. मात्र अद्यापही मानधनवाढीचा निर्णय लागू करण्यात आला नाही. त्यामुळे स्थायीचा निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा डॉक्टरांना सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी देण्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
- डॉ. शेषराव सूर्यवंशी, अध्यक्ष, भरारी पथक, मुंबई.

(Doctors in flying squad seeking permission to end life to CM)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT