sanjay raut sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

...म्हणून CDS बिपीन रावत यांच्या मृत्यूबद्दल शंका - संजय राऊत

सीडीएस बिपीन रावत यांचा काल विमान अपघातात मृत्यू झाला.

सुधीर काकडे

सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu ) हेलिकॉप्टर अपघातात (Helicopter Crash) मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे. लष्कराच्या सर्वोच्च अधिकाऱ्याच्या असा अपघाती मृत्यू झाल्यानं शंका देखील उपस्थित केली जातेय. यावर सेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपलं मत मांडलं आहे.

रावत यांच्या मृत्यूनंतर देशभरातून हा घातपात असेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. सध्या चीन सोबत तणावाची स्थिती आहे, पाकिस्तानच्या सीमेवर सुद्धा कुरापती सुरू आहेत, अशा वेळी देशाच्या सेनापतीचा मृत्यू होतो, त्यामुळे लोकांच्या मनात शंका आहे. अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत. याबद्दल बोलताना राऊत यांनी एक जुनी घटना देखील सांगितली.

पुढे तो बोलताना संजय राऊत बोलताना यांनी 1952 साली पुंछ भागात लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं विमान कोसळलं होतं, त्यामध्ये लेफ्टनंट जनरल पदाचे अधिकारी होते. तेव्हापासून हवाई प्रवासात अधिकाऱ्यांनी सावधानता बाळगावी आणि एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी एकत्र प्रवास करु नये अशा सुचना देण्यात आल्या होत्या. तसेच हा मुद्दा जर संसदेत चर्चेत आला तर लोकांच्या मनातील प्रश्न आम्ही विचारू असंही राऊत यांनी सांगितलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! विमानतळावरून १५ नवीन विमानांची उड्डाणे; कुठे आणि कधीपासून? जाणून घ्या...

Vaibhav Sooryavanshi ला भारतीय संघात पदार्पणाची संधी द्यायला हवी का? ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतो, अरे त्या पोराला खेळू द्या...

Pune Crime : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने संपविले जीवन; सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल

Pune Water Supply News : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी सुरळीत राहणार

RCB vs LSG: भुवनेश्वर-रसिकची जोडी भारी! लखनौचा फलंदाजी क्रम पूर्णपणे ढासळला, आरसीबीला किती धावांचं आव्हान?

SCROLL FOR NEXT