महाराष्ट्र बातम्या

डॉ. सुभाष चौधरी यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

तेजस वाघमारे



मुंबई : नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूपदी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (ता. 8) जे.डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, नागपुर येथे प्राचार्य असलेल्या डॉ सुभाष चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. चौधरी यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा कार्यकाळ 7 एप्रिल रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ मुरलीधर चांदेकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. डॉ सुभाष चौधरी यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या  निवडीसाठी राज्यपालांनी अलाहाबाद उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

कानपूरच्या इंडियन इंस्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ.अभय करंदीकर आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चंहादे हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानतर राज्यपालांनी चौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT