Dr. Babasaheb Ambedkar Quotes esakal
महाराष्ट्र बातम्या

Dr. Babasaheb Ambedkar Quotes : बाबासाहेबांचे हे विचार नक्कीच तुमच्या जीवनात परिवर्तन घडवतील

शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग ;डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सकाळ डिजिटल टीम

Dr. Babasaheb Ambedkar Quotes : शिक्षणाने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे स्वतःच या बदलांचे मूर्तिमंत उदाहरण आहे.बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःपुरता मर्यादित न ठेवता हजारो वर्षे गुलामीत असणाऱ्या लाखो लोकांसाठी अर्पण केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी मालोजीराव हे मेजर सुभेदार पदावर सैनिकी अधिकारी होते. 14 एप्रिल 1891 रोजी दुपारी 12 वाजता बाबासाहेब यांचा जन्म झाला. बाबासाहेबाना शाळेत प्रवेश दिला नाही. त्यांना माणसासारखी वागणूक दिली नाही. त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवला तो शिक्षणाच्या माध्यमातून. डॉ आंबेडकर यांचे विचार तुम्हालाही जगण्याची नवी आशा दाखवतील.

शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे.आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षणप्रसाराला दिले पाहिजेतांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या विकासाची कोणतीही योजना पूर्णत्वाला जाणार नाही.

मी त्या धर्माला मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो.धर्म आणि गुलामी यांत तुलना होणे शक्य नाही.लोकं आणि त्यांच्या धर्माचे मूल्यांकन हे सामाजिक नीतिमूल्यांवर आधारित प्रमाणकांनी व्हायला हवे.मानवाच्या प्रगतीसाठी धर्म अतिशय महत्वाचा आहे.

जो धर्म जन्माने एकाला श्रेष्ठ व दुसऱ्याला कनिष्ठ मानतो तो धर्म नसून गुलाम बनवण्याचे षडयंत्र आहे.धर्म मानवासाठी आहे. माणूस धर्मासाठी नाही.मानसिक उन्नती हाच मानवी अस्तित्त्वाचा मुख्य हेतू असायला हवा.

सन्मानानं जगायचं असेल तर स्वतःचीच मदत करणे शिका. तीच आपली सर्वोत्तम मदत असते.शक्ती आणि प्रतिष्ठा संघर्षाशिवाय मिळत नाहीत.आयुष्य लांब नको महान असायला हवं.जो वाकू शकतो, तो वाकवूही शकतो.चांगलं दिसण्यासाठी नव्हे तर चांगलं असण्यासाठी जगा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation: दिल्लीत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा; महिला आरक्षण आणि फेररचना विधेयके अधिवेशनात मंजूर होणार, अमित शहांच्या भेटीनंतर मोठे विधान

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

SCROLL FOR NEXT