Dr Sameer Gandhi statement In implementation of PCPNDT Maharashtra is pioneer for country nashik news eskal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Exclusive : ‘पीसीपीएनडीटी’ अंमलबजावणीत महाराष्ट्र ठरावा देशासाठी पथदर्शी : डॉ. समीर गांधी

सकाळ वृत्तसेवा

Sakal Exclusive : बेकायदेशीररीत्या गर्भलिंग तपासणीला आळा घालण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा (पीसीपीएनडीटी) अस्‍तित्‍वात असला तरी देशभरात एकसंघता अद्यापही नाही.

महाराष्ट्रात केवळ रेडिओलॉजिस्‍टला चाचणीचे अधिकार देताना अन्‍य संहितादेखील निश्‍चित केली आहे.

अशाच स्वरूपाची संहिता इतर राज्‍यांतही अवलंबण्यासाठी महाराष्ट्र पथदर्शी ठरू शकतो, अशी माहिती इंडियन रेडिओलॉजिकल ॲन्ड इमेजिंग असोसिएशनचे खजिनदार डॉ. समीर गांधी यांनी दिली. (Dr Sameer Gandhi statement In implementation of PCPNDT Maharashtra is pioneer for country nashik news)

राज्‍यस्‍तरीय परिषदेनिमित्त नाशिकला आलेल्‍या डॉ. गांधी यांनी ‘सकाळ’सोबत संवाद साधला. ते म्‍हणाले, की केंद्राने कायदा अवगत केला असला तरी आरोग्‍य हा राज्‍य शासनाच्‍या अंतर्गत येणारा विषय आहे. त्‍यामुळे देशातील काही राज्‍यांमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अद्यापही होताना दिसत नाही.

याचे प्रमुख कारण म्‍हणजे तेथील एमबीबीएस या डॉक्‍टरांना किंवा अन्‍य पात्रता मिळालेल्‍या तंत्रज्ञांना सोनोग्राफी मशिन खरेदी करण्याची व चाचणी करण्याची परवानगी आहे. काहींकडून तर थेट पशूंसाठीच्‍या सोनोग्राफी मशिनचा वापर गर्भलिंग निदानासाठी केला जात आहे. महाराष्ट्रात पुण्यात एका रेडिओलॉजिस्‍टवर चुकीच्‍या पद्धतीने कारवाई केल्‍यानंतर आम्‍ही शासकीय पातळीवर पाठपुरावा केला होता.

तत्‍कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासोबत झालेल्‍या बैठकीनंतर या प्रक्रियेत सुसूत्रता आणली आहे. आता महाराष्ट्रात केवळ परवानाधारक रेडिओलॉजिस्‍टलाच सोनोग्राफी मशिन उपलब्‍ध होते. त्‍यामुळे बेकायदेशीर गर्भलिंग निदानाला बहुतांश प्रमाणात आळा बसला आहे. याच धर्तीवर इतर राज्‍यांनीही संहिता अवगत केली पाहिजे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

केवळ परवानाधारक रेडिओलॉजिस्‍टलाच सोनोग्राफीसारख्या चाचण्या करण्याचे अधिकार दिल्‍यास गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवणे शासनालाही सोयीचे ठरणार आहे. राष्ट्रीय पातळीवर एकसंघता आणण्यासाठी आम्‍ही प्रयत्‍नशील आहोत.

भारतात प्रगत देशांतील रुग्णांकडून चाचण्या

विविध चाचण्यांच्‍या दरांबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नावर डॉ. गांधी म्‍हणाले, की जागतिक स्‍तरावर सर्वांत स्‍वस्‍त चाचण्या भारतात उपलब्‍ध आहेत. एखाद्या चाचणीसाठी देशात पाच हजार रुपये लागत असतील, तर अमेरिकेतील रुग्‍ण त्‍यासाठी पाच हजार डॉलर मोजतात.

इतकेच नव्हे, तर युरोपमधील अनेक प्रगत देशांमध्ये चाचण्यांसाठी एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे अनेक अनिवासी भारतीय मायदेशी आल्‍यावर येथे चाचण्या करून घेण्याला प्राधान्‍य देत असतात.

‘एआय’ ठरणार उपयुक्‍त

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स’ अर्थात ‘एआय’ हे आधुनिक तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातही प्रभावी ठरत आहे. विविध रेडिलोलजिकल चाचण्यांसाठी तंत्रज्ञानाचा निश्‍चित उपयोग होईल. परंतु ‘एआय’ हे केवळ एक साधनाच्‍या रूपाने वापरले जावे.

चाचणीतील निष्कर्षांवर पुढील उपचाराची दिशा ठरत असल्‍याने अहवालासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहाता, तज्‍ज्ञांच्‍या निरीक्षणाखालील अहवालच महत्त्वाचा ठरेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

कोविडमध्ये रेडिओलॉजिस्‍टने बजावली महत्त्वाची भूमिका

कोरोना महामारी काळातील योगदानाबद्दल डॉ. गांधी म्‍हणाले, की महामारीच्‍या काळात रुग्‍णाच्‍या स्‍पर्शातून प्रादुर्भाव वाढीचा धोका होता. अशा परिस्‍थितीत रेडिओलॉजिस्‍टने केलेल्‍या विविध चाचण्यांच्‍या आधारे हजारो रुग्‍णांवर उपचार करण्यात आले.

या काळात रेडिओलॉजिस्‍टने अत्‍यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मोठ्या प्रमाणावर झालेल्‍या ‘एचआरसीटी’ चाचण्यांचे दूरगामी परिणाम उद्‌भवण्याची शक्‍यता नसल्‍याचा दावादेखील त्‍यांनी केला. परंतु ‘एआय’ हे केवळ एक साधनाच्‍या रूपाने वापरले जावे.

चाचणीतील निष्कर्षांवर पुढील उपचाराची दिशा ठरत असल्‍याने अहवालासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहाता, तज्‍ज्ञांच्‍या निरीक्षणाखालील अहवालच महत्त्वाचा ठरेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Probable Ministers List : नितीशकुमार यांच्या नवीन मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांची यादी आली समोर!

Pune Election 2025 : निवडणुकीच्या रिंगणातून माघार! पहिल्या दिवशी लोणावळ्यात नगराध्यक्ष, तर जिल्ह्यातून १४ सदस्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले

Latest Marathi News Update LIVE: शालार्थ आयडी घोटाळ्यात तीन लिपीक गजाआड

Jasprit Bumrah And Hardik Pandya: वनडे मालिकेमधून हार्दिक, बुमराची माघार? टी-२० विश्‍वकरंडकाला प्राधान्य; आयपीएलनंतर वनडेकडे लक्ष

Health News : ससून, जे. जे. रुग्णालयांतील सेवा कंपन्यांकडे; 'पीपीपी'मुळे सरकारी आरोग्य सेवा धोक्यात- २१ डिसेंबरला मुंबईत मोठे आंदोलन

SCROLL FOR NEXT