Dress code esakal
महाराष्ट्र बातम्या

Dress Code: राज्यातील तब्बल ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू; महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती

सकाळ डिजिटल टीम

धारावी: जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती यांसह कोकण मिळून महाराष्ट्रातील एकूण ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात येत आहे. त्यात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील १८ मंदिरांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे आज माहीम येथील शीतलादेवी मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ७ जून रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मरकामध्ये मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील मंदिरांच्या ट्रस्टीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित सर्व मंदिरांच्या ट्रस्टींनी मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा ठराव एकमताने संमत केला.

शासकीय कार्यालयांमध्ये वस्त्रसंहिता लागू आहे, तर मग मंदिरात का नाही, असा सवाल महासंघातर्फे या वेळी केला गेला. मंदिरांत चैतन्य राहावे, यासाठी हे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर यांनी मंदिरामध्ये सात्त्विक पोशाख परिधान केल्यामुळे मंदिरातील पावित्र्याचा लाभ होत असल्याचे या वेळी म्हटले. वस्त्रसंहिता लागू करण्यासोबतच मंदिरांशी संबंधित अन्य गोष्टींकडे लक्ष दिले जाईल, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election: मैथिली ठाकूर निवडणुकीच्या आखाड्यात; बिहार निवडणुकीत कोणकोणते 'सेलिब्रिटी' उतरणार?

Vadgaon Sheri News : लंडनच्या रोबोटची वडगाव शेरीत ‘कमाल’; तीनशे मीटर आत जाऊन शोधले बेकायदा नळजोड

Saraswati River India: भारतात सरस्वती नदी कोणत्या ठिकाणी दिसते? जाणून घ्या तिचा मार्ग आणि ठिकाणं

अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी.

Palghar News: मुरबे बंदराला स्थानिकांचा विरोध! जनसुनावणीत ८ हजारांहून अधिक विरोधी निवेदने

SCROLL FOR NEXT