Nagpur News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nagpur News: मंदिरात तोकडे कपडे बॅन ! नागपूरपासून सुरवात, या ३०० मंदिरात होणार लागू

अशोभनीय, तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश नाही

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंदिरांवरुन वाद सुरु असल्याचे दिसुन येत आहे. काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या फलकावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच आता महाराष्ट्र मंदिर महासंघाने एक मोठी घोषणा केली आहे. नागपुरमधील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून करण्यात आली आहे. पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300पेक्षा जास्त मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचंही महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून सांगण्यात आलं आहे.

नागपुरातील गोपाळ कृष्ण मंदिर, धनतोली, संकटमोचन पंचमुख हनुमान मंदिर, बेलोरी, ब्रहस्पती मंदिर, कोन्होलीबारा, दुर्गामाता मंदिर, हिलटॉप चार मंदिरात ही संहिता लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाची नागपुरात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत सुनील घनवट यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जर कोणी मंदिरात अशोभनीय, तोकडे कपडे घालून आले तर त्याला परत पाठवण्याऐवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर शॉल, ओढणी, धोतर असे कपडे देण्यात येणार आहेत. भाविकाला ते वापरून पांघरून मंदिरात जाता येणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील हे नियम आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT