Aryan Khan Sakal
महाराष्ट्र बातम्या

समीर वानखेडे आणि राजकीय नेत्यांमधील वादाशी संबंध नाही : आर्यन खान

सकाळ डिजिटल टीम

न्यायालयात एनसीबीने आर्यन खानचा जामीन फेटाळायलाच हवा अशी मागणी केली.

कार्डेलिया क्रूज ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खान ३ ऑक्टोबरपासून अटकेत आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयात एनसीबीने आर्यन खानचा जामीन फेटाळायलाच हवा अशी मागणी केली. साक्षीदारांना फोडण्याचे आणि पुराव्यांशी छेडछाडीचा प्रयत्न केला जात असल्याचं एनसीबीने यावेळी न्यायालयात सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात म्हटलं की, आर्यन खानचे प्रभाकर साईल आणि त्याचा मालक किरण गोसावी याच्याशी काही संबंध नाही. तसंच सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात असंही म्हटलं की, 'एनसीबीचे विभागीय संचालक आणि इतरांचा जो काही वाद सुरु आहे त्याच्याशी आर्यनचा काहीएक संबंध नाही.' सध्या समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर असे आरोप केले आहेत. त्याबाबत पत्रकार परिषदेतून अनेक खुलासे केले आहेत.

आर्यन खानचे आंतरराष्ट्रीय कनेक्शनमधून दिसून येतं की, तो जसं दाखवतोय तसं नाहीय. त्यानं स्वत: ग्राहक असल्याचं दाखवलं आहे. त्याच्याविरुद्ध पुरावा नाही असं म्हणणं थोडं घाईचं ठरेल असंही एनसीबीने न्यायालयात म्हटलं. आर्यनला जामीन देण्यात येऊ नये असं म्हणत एनसीबीने विरोध दर्शवला.

प्रभाकर साईलने केलेल्या आरोपाचा संदर्भ देत एनसीबीने म्हटलं की, साक्षीदारांना फितूर केलं जातंय. तपासात अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यामुळे जामीन दिला जाऊ नये. साक्षीदारांवर दबाव निर्माण करून तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्यान आर्यनला जामीन नाकारण्यात यावा अशी मागणी एनसीबीने केली. शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीने पंच असलेल्या साक्षीदारांवर दबाव टाकला आहे. आर्यन खानचा जामीन फेटाळण्यासाठी हे एक कारण पुरेसं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

SCROLL FOR NEXT