Buldhana Accident News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Accident News: मद्यधुंद कारचालकाने दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना उडवलं; वर्षाच्या शेवटच्या रात्री मोठा अपघात

Buldhana Accident News: मद्यधुंद कारचालकाने सुसाट कार चालवत दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ४ जण जखमी झाले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Buldhana Accident News: सर्वत्र नववर्षाचं स्वागत जल्लोषात आंनदात सुरू होत असताना दुसरीकडे बुलढाण्यात वर्षाच्या शेवटच्या रात्री भीषण अपघात झाला आहे. मद्यधुंद कारचालकाने सुसाट कार चालवत दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ४ जण जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थरकाप उडवणारी ही घटना शेगाव -बाळापूर मार्गावर काल (रविवारी) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारमधून ४ तरुण प्रवास करीत होते. कारचालक नशेत गाडी चालवत होता. शेगाव -बाळापूर मार्गावरून जात असतानाच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले, आणि त्याने समोरुन जात असलेल्या दुचाकीसह ३ ते ४ वाहनांना धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की वाहनांना धडक दिल्यानंतर कार डिव्हाडरवर चढून रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

मात्र, अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT