महाराष्ट्र

औरंगाबादवर साथीच्या रोगांचे सावट 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : हवामानातील बदल व गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झालेल्या कचरा कोंडीने औरंगाबाद शहराचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. सध्या घाटी रुग्णालयात डेंगीचे सहा, स्वाइन फ्लूचे दोन, तापाचे 224, तर 34 न्युमोनियाचे रुग्ण उपचार घेत आहेत. शहर परिसरातील चार प्रक्रिया केंद्रांवर सुमारे 23 हजार मेट्रिक टन कचरा प्रक्रियेविना पडून आहे. 

दरवर्षी ऑगस्टपासून साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते; मात्र गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण यंदा अधिक आहे. त्यामुळे घाटीच्या डॉक्‍टरांनी चिंता व्यक्त करत महापौर नंदकुमार घोडेले, महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांकडे आपत्कालीन वॉर्ड सुरू करण्यासाठी मदतीची मागणी केली. रोज सहा ते आठ तापाचे रुग्ण दाखल होत आहेत. त्यात डेंगी, न्युमोनियाचे सहा रुग्ण आढळले. 

कचरा कोंडी फुटेना 
कचरा कोंडीला सहा महिने उलटले आहेत; मात्र अद्याप महापालिकेला कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करता आलेले नाहीत. पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा व कांचनवाडी भागात सुमारे 23 हजार टन कचरा पडून आहे. कचऱ्याची दुर्गंधी, माशांचे वाढते प्रमाण यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 
 
अशी घ्या काळजी 
- डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्या 
- धुणे-भांडे झाल्यावर ती जागा स्वच्छ धुवा 
- कुंड्या व शोभेच्या वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नका 

रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन वॉर्ड मेडिसीन विभागात सुरू करीत आहोत. औषधी व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने महापालिका व आरोग्य उपसंचालकांकडे मदत मागितली आहे. 
- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT