अवकाळी पाऊस  टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

कोकण, खानदेशानंतर मराठवाडाही संकटात... विजांसह पाऊस बरसणार

मराठवाड्यात ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्र, कोकणात हजेरी लावली तर आता मराठवाड्यात ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे.

गेल्या ७ मार्चपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. सुरवातीला सुरवातीला उत्तर महाराष्ट्र त्यानंतर कोकणात अवकाळी पाऊस बरसला तर आता मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या तर लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यामध्येसुध्दा ढगाळ वातावरण आहे.

Regional Meteorological Center, Mumbai

अवकाळी पावसाने नाशिकमधील द्राक्ष बागा, कोकणाती आंबा व काजू बागांचे नुकसान केले आता मराठवाड्यातील रब्बी हंगामीतील सर्वच पीके अंतिम टप्प्यात असताना इथे जर अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या तर रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT