DJ Noise esakal
महाराष्ट्र बातम्या

Noise Pollution: डीजे ठरला शिक्षकाच्या मृत्यूचं कारण! महिनाभरापासूनची झुंज ठरली अपयशी

डीजेच्या दणदणाटी आवाजामुळे प्रकृती बिघडलेल्या शिक्षकाचा मृत्यू

अंकिता खाणे (Ankita Khane)

मोठ्या आवाजात डीजे लावायला बंदी असली सर्वत्र सण-उत्सवात पुन्हा डीजेचा आवाज घुमतो. त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण केवळ त्रासदायकच नव्हे, तर जीवघेणेही ठरते. श्रीगोंदा तालुक्यातील एका शिक्षकाला डीजेच्या आवाजामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतील डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्यामुळे शिक्षक अशोक बाबूराव खंडागळे (वय ५८) कोमात गेले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूची झुंज दिल्यानंतर शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

शिक्षक अशोक बाबुराव खंडागळे (वय ५८) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अशोक खंडागळे हे हनुमान जयंतीच्या दिवशी कौडाणे (ता. कर्जत) येथे गेले होते. तेथे डीजेच्या आवाजाने त्यांना त्रास होऊ लागला. त्यातच ते कोमात गेले. महिनाभर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पार्थिवावर कौडाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

खंडागळे यांच्या मृत्यूला थेट डीजेचा कारणीभूत आहे का, हे नेमकेपणाने स्पष्ट झालं नाही. मात्र डीजेचा आवाज ऐकल्यापासूनच त्यांना त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ते कोमात गेले होते. खंडागळे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंब, नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष संदीप मोटे, शिक्षक नेते गजानन ढवळे, अशोक आळेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अशोक खंडागळे यांनी ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले. ३१ मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यानिमित्त शिक्षकांनी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT