solapur city sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर शहरात ‘डीजे’च्या दणदणाटामुळे कानठळ्या! आवाज मर्यादेत असल्याचा पोलिसांचा दावा, पण पोलिस अधिकाऱ्यांच्याच कानात कापसाचे बोळे तर अनेकांची कानात बोटे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शांतता झोनमध्ये ४० ते ५० डेसिबल, निवासी भागात ४५ ते ५५ डेसिबल, व्यापारी झोनमध्ये ५५ ते ६५ डेसिबल आणि औद्योगिक क्षेत्रात ७० ते ७५ डेसिबलपर्यंत आवाज बंधनकारक आहे. तरीपण, सोलापूर शहरातील प्रत्येक मिरवणुकीत हा नियम पायदळी तुडविला जातो.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शांतता झोनमध्ये ४० ते ५० डेसिबल, निवासी भागात ४५ ते ५५ डेसिबल, व्यापारी झोनमध्ये ५५ ते ६५ डेसिबल आणि औद्योगिक क्षेत्रात ७० ते ७५ डेसिबलपर्यंत आवाज बंधनकारक आहे. तरीपण, सोलापूर शहरातील प्रत्येक मिरवणुकीत हा नियम पायदळी तुडविला जातो. नुकत्याच झालेल्या श्री मार्कंडेय मिरवणुकीत अनेकांनी कानात बोटे, बोळे घातले होते, तरीपण ‘डीजे’चा आवाज मर्यादेतच होता, असा दावा जेलरोड पोलिसांनी केला आहे.

शनिवारी (ता. ९) श्री मार्कंडेय मिरवणुकीतही ‘डीजे’चा दणदणाट ऐकायला मिळाला. या मिरवणुकीत खुद्द जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्याच कानात कापसाचे बोळे दिसले. अन्य काही पोलिस अंमलदारांचेही तसेच होते. याशिवाय मिरवणुकीत सहभागी अनेकांनी कानात बोटे घातलेली होती. सोलापूर शहरात वर्षातील ३६५ पैकी १८७ दिवस सार्वजनिक मिरवणुका काढल्या जातात. त्यामुळे सर्वाधिक सण-उत्सव साजरा करणारे शहर म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डला सोलापूरची नोंद आहे. ‘डीजे’च्या कर्णकर्कश आवाजामुळे काहींना बहिरेपणा आला, हदविकाराच्या त्रासातून अनेकांची प्रकृती बिघडली. काही दिवसांपूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत सहभागी अभिषेक बिराजदार (वय २७) या तरुणाचा हदयविकाराने मृत्यू झाला.

सोलापूर शहरात रस्त्यालगत निवासी इमारती, रुग्णालये, शाळा आहेत, तरीदेखील मिरवणुकांमधील आवाज मर्यादेत नसतोच. पण, कोणाच्या भावना दुखावू नयेत म्हणून पोलिस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केवळ आवाज मर्यादेत असावा, डीजे लावू नका, इतरांच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य नको, मिरवणूक एकाच ठिकाणी खूपवेळ रेंगाळत ठेवू नये, अशा सूचना देतात. पण, त्याचेही पालन होत नाही. त्यामुळे शहरातील ‘डीजे’चा दणदणाट कधी थांबणार, असा प्रश्न सोलापूरकर विचारत आहेत.

वार्निंग दिल्यावरच आवाज केला कमी

श्री मार्कंडेय मिरवणुकीत काही मंडळांनी ‘डीजे’ लावला होता. ‘डीजे’चा आवाज मोजण्यासाठी पोलिसांच्या हाती पाच मशिन (ध्वनी पातळी मीटर) देण्यात आल्या होत्या. ज्यावेळी मशिनमध्ये आवाजाची मर्यादा ओलांडण्याचे जाणवले, त्यावेळी पोलिसांनी संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना करून आवाज कमी करायला सांगितले. पहिल्या वार्निंगनंतर त्यांनी आवाज कमी केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पण, मिरवणुकीतील वस्तुस्थिती वेगळीच होती.

...तेव्हाच होतो ‘डीजे’ जप्त

वास्तविक पाहता सार्वजनिक मिरवणुकांमध्ये आवाजाच्या मर्यादेत एक बेस, एक टॉपलाच परवानगी आहे. तरीपण, बिनधास्तपणे ‘डीजे’ लावले जातात. मिरवणुकांमध्ये आवाजाचा दणदणाट अर्धा, एक किलोमीटरपर्यंत ऐकू येतो. आवाज मोजमापासाठी पोलिसांकडे मशिन असतात, पण गुन्हा कोणावरच दाखल होत नाही. पोलिस म्हणतात, आवाज मर्यादा ओलांडू लागला की मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पहिली वार्निंग दिली जाते. तरीपण, आवाज कमी न केल्यास ‘डीजे’ बंद करून तो जप्त केला जातो, असा अजब दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे एका व्यासपीठावर, फडणवीसही राहणार उपस्थित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला, CSKने तुक्का मारला अन् स्टार सापडला; एबी डिव्हिलियर्सने IPL फ्रँचायझीचे टोचले कान

HSRP Number Plate: 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख! HSRP नंबर प्लेटसाठी आजच अर्ज करा

स्टार प्रवाहवरील नशीबवान मालिका आहे 'या' गाजलेल्या सिरियलचा रिमेक ! असं असू शकतं कथानक

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरून वाद! थेट सरकारला 48 तासांची नोटीस, 46 लाख दंड वसूल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT