Supriya Sule Rohit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

'माझं बोलणं झालंय...'; रोहित पवारांच्या ED चौकशीवर सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं!

पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीनं पुण्यात जनआक्रोश आंदोलन केलं.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात सध्या विरोधकांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या कारवायांचा धडाका सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर आता ईडीने निशाणा साधला आहे. त्यावरुनच रोहित पवारांच्या आत्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला काही लपवायची गरज नाही, असंही सुळे यांनी सांगितलं आहे. (Supriya Sule on Rohit Pawar)

पुण्यातल्या कोथरुडमध्ये महागाईविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सुप्रिया सुळे सहभागी झाल्या आहेत. तिथे त्या बोलत होत्या. रोहित पवारांच्या (Rohit Pawar) चौकशीविषयी विचारणा केली असता सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, रोहित पवार यांची कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. अशा बातम्या फक्त माध्यमांमध्ये चालतायत. प्राथमिक चौकशी झाल्याच्या बातम्याही येतायत. पण माझं रोहितशी बोलणं झालंय, त्यांना अजून नोटिस आलेली नाही.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, आमच्यापैकी कोणालाही नोटीस आली तर आमची नेहमी सहकार्याची भूमिका राहिलेली आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळं आम्हाला काही लपवायची गरज नाही. अशी काही चौकशी झाली तर आम्ही उत्तर देऊ. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीनं पुण्यात जनआक्रोश आंदोलन केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सरकारचा निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT