ED interrogation of Rohit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : रोहित पवारांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी; पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची गुरुवारी दुसऱ्यांदा ईडी चौकशी होणार आहे. बारामती Agro प्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. २४ जानेवारी रोजी याच प्रकरणात त्यांची तब्बल ११ तास चौकशी झाली होती.

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची गुरुवारी दुसऱ्यांदा ईडी चौकशी होणार आहे. बारामती Agro प्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. २४ जानेवारी रोजी याच प्रकरणात त्यांची तब्बल ११ तास चौकशी झाली होती.

२४ तारखेची चौकशी आटोपल्यानंतर रोहित पवार म्हणाले होते की, १ तारखेला मला परत बोलावलं आहे. जी माहिती त्यांनी मागवली आहे ती माहिती मी दिलेली आहे. १ तारखेला अतिरिक्त माहिती मागवलेली आहे, तीही मी देणार आहे. मी आधी व्यावसायात आलो मग राजकारणात आलो. काही लोक आधी राजकारणात आले आणि नंतर व्यावसायात आले. आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही मग त्यांनी का आम्हाला प्रश्न करायचा, हा माझा प्रश्न आहे.

रोहित पवार यांना समर्थन देण्यासाठी स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर आणि अन्य आमदार, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आज (गुरुवारी) पुन्हा कार्यकर्त्यांनी मुंबईत गर्दी करण्यात सुरुवात केली आहे. रोहित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजीदेखील केली जातेय.

दरम्यान, २४ तारखेच्या चौकशीनंतर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले होते की, आमच्याही चौकशा झाल्या परंतु आम्ही कधीच अशी गर्दी जमवली नाही. त्यावर रोहित पवारांनी, ''जे लोक जमले होते ते स्वतःहून आमच्या समर्थनार्थ जमले होते'' असं प्रत्युत्तर दिलं होतं.

तुम्ही पळून गेलात- रोहित पवार

पहिल्या ईडी चौकशीनंतर रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांना टार्गेट केलं होतं. ''पळणाऱ्यांच्या पाठीमागे साहेब (शरद पवार) थांबत नाहीत पण लढणाऱ्यांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहतात. हा वारसा विचारांचा आणि स्वाभिमानाचा आहे. आपल्या सगळ्यांची संघर्षाची तयारी असली पाहिजे. अधिकाऱ्यांना सहकार्य करतो, याचा अर्थ असा नाही.. तुम्ही स्वहितासाठी सत्तेत गेलात, पळून गेलात.. म्हणून आमच्याकडे बोट करत असाल तर आम्ही हे चालू देणार नाहीत.'' अशा शब्दांत त्यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT