Uddhav Thackeray suspend eknath shinde from shiv sena Legal challenge to decision mumbai  Sakal
महाराष्ट्र बातम्या

खरी शिवसेना कोणाची, पुरावे द्या; शिंदे गट-उद्धव ठाकरेंना आदेश

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे 40 हून आमदार सोबत घेऊन बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केलं. तसेच मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. मात्र शिवसेनेच्या आमदारांना घेऊन ते पक्षातून बाहेर गेल्यामुळे मोठा पेच निर्माण झालं असून हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यातच आता शिवसेना कोणाची याचे पुरावे 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्याचं सुत्रांनी सांगितलं. (Shivsena Ownership news in marathi)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षावर दावा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच निवडणूक आयोगाचे आदेश आले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे वारंवार हेच सांगतात की, आम्ही शिवसेनेतच असून शिवसैनिक आहोत. तर शिंदे गटातील आमदार देखील हेच सांगतात.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया आली आहे. सावंत म्हणाले की, शिवसेना कोणाची आहे, यासंदर्भातील पुरावे आमच्याकडे आहे. त्यामुळे ''दुध का दुध पाणी का पाणी होईल'', असंही सावंत यांनी म्हटलं.

दरम्यान शंभुराज देसाई म्हणाले की, निवडणूक आयोगाने मागितलेली कागदपत्रे आणि बहुमताचे पुरावे आम्ही मुदतीत नक्कीच सादर करू. तसेच निवडणूक आयोग आणि कायद्यावर आमचा विश्वास असल्याचं त्यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT