राज कुंद्रा गुगल
महाराष्ट्र बातम्या

पॉर्न रॅकेट प्रकरणी राज कुंद्रावर ईडीकडून गुन्हा दाखल

याप्रकरणात उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये अटक केली होती.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणात उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये अटक केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. पॉर्न रॅकेट प्रकरणाशी संबंंधित त्याच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आल्याचं समोर येत आहे. सध्या जामीनावर बाहेर असलेल्या राज कुंद्राला पॉर्न रॅकेट प्रकरणी २०२१ मध्ये अटक झाली होती. राज कुंद्रा या प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. आता याप्रकरणाच ईडीने गुन्हा नोंद केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

या कारवाईमुळे उद्योगपती राज कुंद्रा (Businessman Raj Kundra) याच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने राज कुंद्राविरुद्ध (Raj Kundra) गुन्हा नोंद केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) राज कुंद्राविरुद्ध फेमा (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या दोघा पती पत्नीच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

फेब्रुवारी 2019 मध्ये, राज कुंद्राने आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि हॉटशॉट्स नावाचे अॅप विकसित केले. यूकेस्थित कॅनरीन कंपनीचे सीईओ प्रदीप बक्षी हे खरे तर राज कुंद्राचे मेहुणे आहेत. मात्र या हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीसाठी राज कुंद्राच्या कंपनी विहानने केनरिन कंपनीशी करार केला होता. तसंच या देखभालीसाठी विहान कंपनीच्या 13 बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचे व्यवहार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Shivaji Maharaj Statue Row : चिखला गावचे फरार सरपंच Ganesh Kakad कोण? पहिल्यांदाच समोर येत व्हिडिओद्वारे दिली प्रतिक्रिया

SL vs ENG, T20 WC: W,W,W,W,W ! श्रीलंकेचा निम्मा संघ ३४ धावांत तंबूत; इंग्लंडच्या पार्टटाईम फिरकीपटू विल जॅक्सने वाढवली डोकेदुखी

Mumbai Traffic: मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी वाहतुकीवर कडक निर्बंध! अनेक रस्ते बंद; तर पार्किंगवर बंदी, मार्गदर्शक तत्त्वे काय?

Railway News: ट्रेन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आयआरसीटीसीकडून मोठे बदल; प्रवाशांना दिलासा, नवे अपडेट काय?

माओवाद्यांचा सर्वोच्च नेता थिप्परी तिरुपती उर्फ देवजीसह तेलंगणात शरण; दहा कोटींचे होते बक्षीस

SCROLL FOR NEXT