bhavana gawali e sakal
महाराष्ट्र बातम्या

खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ? ED कडून दुसरं समन्स जारी

भाग्यश्री राऊत

मुंबई : शिवसेना खासदार भावना गवळी (Shivsena MP Bhavana Gawali) यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स (ED Probe Bhavana Gawali) बजावले असून येत्या २० ऑक्टोबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनी लाँडरींगच्या आरोपाप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले असून यामुळे भावना गवळींच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वाशिम येथे मोर्चा काढला होता. त्यानंतर गवळींच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खानला अटक करण्यात आली होती. त्यामुळे गवळींच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. त्यांना ४ ऑक्टोबरला ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार ईडीने त्यांना १५ दिवसांची मुदत दिली होती.

आता ही मुदत संपत असून भावना गवळींना दुसऱ्यांदा ईडीने समन्स जारी केला आहे. येत्या २० ऑक्टोबरला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार यावेळी देखील खासदार भावना गवळी चौकशीसाठी उपस्थित राहतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Cabinet Meeting Decision: विद्यार्थ्यांसह खेळाडूंना फायदा होणार, मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय

Government Contractors: शासकीय कंत्राटदारांची ९६ हजार कोटींची देयके थकीत; तातडीने पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Marathi News Live Updates : अंमलबजावणी संचालनालयाने आंध्र प्रदेशचे माजी नागरी पुरवठा मंत्री आणि माजी आमदार कारुमूरी वेंकट नागेश्वर राव यांना अटक केली

Gadchiroli Hospital: गडचिरोलीत दुर्दैवी घटना! ‘इथेच सिझर करा’ कुटुंबीयांची विनंती, तरीही रेफर; बाळासह २१ वर्षीय मातेचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT