Edible oil prices rose e sakal
महाराष्ट्र बातम्या

खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ, वाचा सोयाबीनपासून तर जवस तेलाचे भाव

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अवकाळी पावसामुळे सोयाबीन तसेच शेंगदाण्याचे झालेले नुकसान, शेंगदाण्याची सुरू झालेली निर्यात तसेच पाम तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे खाद्य तेलाच्या भावात (edible oil rates) विक्रमी वाढ झाली आहे. सोयाबीन (soybean oil), शेंगदाणे (groundnuts oil), सूर्यफूल, जवस तेलाचे भाव गेल्यावर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी वाढले आहे. नवीन पीक येण्यास अजून चार महिन्याचा कालावधी असल्याने पुढील चार महिने भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे मात्र, गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. (edible oil rate increases nagpur news)

पाम तेलाचे भाव इतर तेलाच्या तुलनेत कमीच असतात. मलेशियामधून आयात होणाऱ्या या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते, त्यात थेट दुप्पट वाढ होऊन ते ३० टक्के झाले आहे. यामुळे पाम तेलाचे भाव वाढले. गेल्या वर्षी खाद्य तेलाचे भाव ९५ ते १०० रुपये प्रति किलो असलेले सोयाबीन तेल सध्या १७५ रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय गेल्या वर्षी शेंगदाना तेल १२० रुपये प्रति किलो मिळत होते ते आता १९० ते १९५ वर जाऊन धडकले. १३० रुपये प्रति किलो असलेले सूर्यफूल तेल १८० ते १८५ रुपयांना विकत घ्यावे लागत आहे.

खाद्यतेलाचे दर (प्रती किलो)

तेल मे २०२१ मे २०२०

सोयाबीन १७५ - १००

सूर्यफूल - १८५ - ११०

शेंगदाणा - १९५ - १२०

विदेशातून ७० टक्के खाद्य तेलाची आयात होते. यंदा अमेरिकेमध्ये आणि मलेशियात पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुले खाद्य तेलाच्या भावात सतत वाढ होत आहे. अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने आवकवर परिणाम होऊन तेलाचे भाव वाढत आहेत.
प्रभाकर देशमुख, व्यापारी
महागाईने चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलाचे भाव सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काटकसरीवर भर दिला जात आहे.
- संगीता गावंडे गृहिणी
कोरोनामुळे वाढलेला आरोग्यावरील खर्च, इंधनाचे वाढते दर, आवाक्याबाहेर जाणारे गॅस सिलिंडरचे दर यामुळे जगावे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या वर्षापासून एक तर कोरोनामुळे व्यवहार ठप्प राहण्यासह सर्वांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
शिवानी मुक्कावार, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT