varsha gaikwad 
महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षेचा निर्णय दोन दिवसांत- वर्षा गायकवाड

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला

मुंबई- सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतर घेतला जाईल असं म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी दोन दिवसांत बैठक घेणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. मुंबई हायकोर्टाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारला झापल्यानंतर आज महत्वाची बैठक घेण्यात आली होती. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातील अंतिम निर्णय दोन दिवसांनी होण्याची शक्यता आहे. (education minister varsha gaikwad on 10th and 12th exam)

विद्यार्थ्यांचे आरोग्य सरकारची प्राथमिकता आहे. पालकांमध्ये परीक्षा घेण्यावरुन भीती आहे. शिवाय तांत्रिक बाबी लक्षात घेता संपूर्ण विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. मुंबई हायकोर्टाच्या टिप्पणीवरही शिक्षणमंत्र्यांनी भाष्य केलं. सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे. कोरोनाची स्थिती गंभीर असून अशा परिस्थित परीक्षा घेणे कठीण आहे. सरकारची बाजू हायकोर्टासमोर मांडू, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊनच परीक्षांसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

SCROLL FOR NEXT