सोलापूर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये १०८ सेविका व २०० मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यातून रिक्त जागांच्या तुलनेत आठपट (२४८३ अर्ज) अर्ज आले आहेत. अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील महिलांचे सर्वाधिक अर्ज आहेत.
अंगणवाडी सेविकांसाठी इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण अपेक्षित आहे, पण डीएड, पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणी, महिलांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. दुसरीकडे मदतनीस पदासाठी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण आवश्यक आहे, तरीपण या पदासाठी बारावी, पदवीप्राप्त तरुणी-महिलांनी अर्ज केल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात विधवा, परितक्त्या महिलांचाही समावेश आहे. शैक्षणिक कागदपत्रांनुसार उमेदवारांना १०० गुण दिले जातात. त्यात पूर्वी कोठे अध्यापन किंवा काम केल्याचा अनुभव असल्यास त्यालाही स्वतंत्र गुण आहेत. आता अर्ज करण्याची मुदत संपली असून सध्या अर्जांची छाननी व कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.
पडताळणीअंती प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर त्या याद्या गावागावात प्रसिद्ध करून हरकती मागविल्या जातील. प्राप्त हरकतींवर निर्णय झाल्यावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या महिला उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. सेविकेला दरमहा १२ ते १५ हजार रुपये तर मदतनीस महिलेला १० हजारांपर्यंत मानधन आहे.
पदभरती अन् अर्जांची संख्या
अंगणवाडी सेविकांची पदे
१०५
महिलांचे एकूण अर्ज
१,०२०
मदतनीसची रिक्त पदे
२००
महिलांचे एकूण अर्ज
१,४६३
अंतिम गुणवत्ता यादीनंतर नियुक्ती आदेश
पडताळणी समिती कागदपत्रांची पडताळणी करेल, त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्या याद्यांवर १० दिवस हरकती मागवून त्या हरकतींवर निर्णय होऊन लगेचच अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.
- प्रसाद मिरकले, महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
सेवानिवृत्तीनंतर खूपच कमी रक्कम
वयाच्या ६५ वर्षांपर्यंत अंगणवाडी सेविका, मदतनीस महिला काम करू शकते. सेवानिवृत्तीनंतर किंवा कामावर असताना मयत झालेल्या सेविकांना केवळ एक लाख रुपये दिले जातात. तर मदतनीस कर्मचाऱ्यास अवघे ७५ हजार रुपये मिळतात. ही रक्कम वाढवावी, अशी मागणी आहे. परंतु, त्यावर शासन स्तरावरून अजूनही निर्णय झालेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.