Maratha Reservation 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation: जळगावात आरक्षणावरुन सासरा-सुनेत जुंपली, सुनेचा राजकारण न करण्याचा सल्ला

Sandip Kapde

Maratha Reservation: जळगावात मराठा आरक्षणावरुन सासरा-सुनेत जुंपली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. तर आरक्षणाचे आश्वासन पूर्ण करा, असा टोला एकनाथ खडसे यांनी सरकारला लगावला आहे. 

संसदीय कायद्यात दुरुस्ती करा आणि मर्यादा वाढवून ५० टक्क्याच्या वर आरक्षण द्या. खरा जर न्याय द्यायचा असेल तर घटनादुरुस्ती केल्याशिवाय न्याय शक्य नाही. आता अधिवशेन घेणार आहात तर हे प्रकरण अधिक न वाढवता,  असंतोष न पसरवता. लोकसभेच्या अधिवेशनात घटनादुरुस्ती करणार आणि मराठा समाजाला आरक्षण देणार हे सरकारने जाहीर करावे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, काल यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. आरक्षण कसा देता येईल. याबाबत चर्चा झाली आहे. याप्रकरणात राजकारण न करता समाजाला कसा न्याय देता येईल याबाबत प्रयत्न केले पाहीजेत.

मराठा आरक्षणावरुन राज्यात गोंधळ सुरु आहे. जलना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे उपोषण सुरु आहे. एक तारखेला या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यामुळे मराठा आंदोलनाला वेग आहे. राज्यभर मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. (latest marathi news)

सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलक उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र सरकारचे शिष्टमंडळ अपयशी ठरले आहे. सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला तर जरांगे यांनी सरकारला ४ दिवसांचा अल्टिमेट दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT