Eknath Khadse  Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे, फडणवीस आता आरक्षण घालविल्याचे ढोल का बडवित नाहीत? एकनाथ खडसे

सरकारने आपली असेल नसेल ती शक्ती पणाला लावून ओबीसी आरक्षण मिळवून द्यावे असे खडसे म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मिळाले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा गाजावाजा करून त्याचे क्रेडिट घेतले; मात्र आता आरक्षण घालवलं त्याचा ढोल का वाजवत नाही? असा टोला एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शुक्रवारी (ता. २९) लगावला. सरकारने आपली असेल नसेल ती शक्ती पणाला लावून तसेच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून ओबीसी आरक्षण मिळवून द्यावे, असेही श्री. खडसे म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होवू नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो अत्यंत दुर्दैवी आहे, ओबीसींवर अन्याय करणारा आहे. सरकारला माझी विनंती होती, की ९२ नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणात व्हाव्यात. त्या जर आरक्षणाविना झाल्या तर ते योग्य होणार नाही.

मंत्रिमंडळ स्थापन होणे गरजेचे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खडसे म्हणाले, की महाराष्ट्राची परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे, आज अनेक भागात पूर परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची गरज आहे. विधान परिषद सेनेत फूट नाही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत ते म्हणाले, विधानपरिषदेतील आमदार आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत आहेत.

विधानसभेत जे शिवसेनेचे आमदार फुटले त्यांनी काय केले हे जनतेसमोर आहेच. मात्र विधानपरिषदेत शिवसेनेचे आमदार त्यांच्या सोबत आहेत. विधानपरिषदेत त्यांचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते पद त्यांच्याकडेच राहिले, ते आमचे सहयोगी पक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT