महाराष्ट्र बातम्या

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिनी खडसेंच्या गाडीवर हल्ला

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या तथा जिल्हा सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. चांगदेव येथून एका कार्यक्रमातून घरी येत असताना सूतगिरणी रस्त्यावर अज्ञातांनी हल्ला. रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडील आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. रोहिनी खडसे यांच्या घरी पोलिस पोहचले आहेत. तेथे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

समोरची काच फेकण्यात आल्याने रोहिणी खडसे थोडक्यात वाचल्या आहेत. राजकीय डावपेचांतूनच हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसापासून शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील व खडसे यांच्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

याबाबत आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी ट्विट केलंय. रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर थोड्या वेळापुर्वी प्राणघातक हल्ला हल्लेखोरांनी केला,एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो .जळगाव पोलिस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रोहिणी खडसे-खेलवलकर चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून कोथळी, मुक्ताईनगर येथे येत होत्या. त्यावेळी सुतगिरणी जवळ अज्ञात लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना दुखापत झाली नसून त्यांच्या काडीवर रॅाडने काचा फोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पोलिस घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा बॅंकेच्या विद्यामान संचालिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! पेठमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के,भिंतींना गेले तडे; नागरिकांमध्ये भीती

पुरुषांच्या अंडकोषांचे कोट्यवधी मिळतील! रील बघून १६ वर्षीय मुलाची केली हत्या, पण नंतर खरेदीदारच मिळाला नाही, शेवटी...

Pune Accident: विजेचा धक्का बसून दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू; सुदैवाने आई बचावली, भावाला वाचवण्यासाठी धावला अन्..

'हृदयी वसंत फुलताना...' गौतमी पाटील आणि जान्हवीचा धमाकेदार डान्स, Viral Video

Marathi News Live Updates : आंबोलीत ट्रकची कारला जोरदार धडक; दोघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT