Eknath Khadse Amit Shah Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : खडसे-अमित शाह यांच्यात खलबतं; पुन्हा भाजपात प्रवेश करणार?

रक्षा खडसेंसोबत एकनाथ खडसे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं विधान मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. आता भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी या भेटीची पुष्टी केली आहे. एकनाथ खडसेंसोबत भेट झाली नाही, पण फोनवरुन चर्चा झाल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे.

दिल्लीत अमित शाहांची भेट झाली नाही, पण फोनवरुन चर्चा झाल्याचं रक्षा खडसे म्हणाल्या. अमित शाहांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे शाहांची भेट होऊ शकली नाही. फोनवरुन काय चर्चा झाली, याबद्दल विचारलं असता रक्षा खडसेंनी उत्तर देणं टाळलं. तसंच खडसे भाजपामध्ये परतणार का यावर मात्र त्यांनी संदिग्ध उत्तर दिलं. मला त्याबद्दल माहिती नाही. मात्र सध्या तरी मी भाजपात आणि एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आहेत, असं उत्तर रक्षा खडसे यांनी दिलं आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे आणि अमित शाह भेटीबद्दल वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर खडसे पुन्हा भाजपामध्ये जाण्याच्या चर्चा सुरू होत्या. या विधानानंतर खडसे यांनी आपण अमित शाह यांची भेट घेतल्याचं मान्य केलं होतं. शिवाय आपले भाजपा नेत्यांसोबत चांगले जवळचे संबंध असल्याची कबुलीही त्यांनी दिली होती. ते देशाचे गृहमंत्री आहे, त्यामुळे आपण त्यांची भेट घेतच राहणार आहोत, असं एकनाथ खडसे म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : भाजपला मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात डॉ. रोंगे यांचे बंड; विठ्ठलाचं दर्शन घेत अपक्ष म्हणून अर्ज भरण्यासाठी रवाना

Supriya Sule: ‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’; दुष्काळावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी 'राष्ट्रवादी’तर्फे आज निदर्शने

Pune News: यंदा कार्तिकी वारीत गटारात तीर्थस्नान! मृत माशांचा खच अन् दुर्गंधीयुक्त सांडपाणी; कार्तिकी वारीपूर्वी इंद्रायणीची अवस्था चिंताजनक

SCROLL FOR NEXT