Eknath Khadse  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse: "मी निवडणूक लढवणार नाही, पण..." राजकीय संन्यासाबाबत एकनाथ खडसे थेटच बोलले

Eknath Khadse Retirement: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ते इथून पुढे निवडणूक लढवणार नाहीत असे म्हटले आहे

आशुतोष मसगौंडे

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ते इथून पुढे निवडणूक लढवणार नाहीत असे म्हटले आहे. परंतू विधानपरिषदेतील माझा 5 वर्षांचा कालावधी बाकी आहे. मी जरी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी मी राजकारणातून निवृत्त झालो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान रविवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश, रक्षा खडसे, रोहिणी खडसे शरद पवार यांच्या पक्षाकडून मिळालेली विधान परिषदेची आमदारकी अशा अनेक विषयांवर भाष्य केले.

पुढची विधानसभा निवडणूक तुम्ही लढवणार का असे विचारल्या असता खडसे म्हणाले, ईथून पुढे मी कोणतीही निवडणूक लढवण्यास ईच्छुक नाही. कारण मी आणखी 5 वर्षांसाठी विधान परिषदेचा आमदार असणार आहे. आणि शरद पवार साहेबांनी सांगितले आहे की, ते एकदा दिलेली गोष्ट परत मागत नाहीत. त्यामुळे पवार साहेबांनीच मला अभय दिला असल्यामुळे दुसऱ्या कोणी राजीनामा मागितल्याने मला काही फरक पडत नाही.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, तुमच्याबरोबर रोहिणी खडसेही भाजपमध्ये येणार आहेत का?

यावर खडसे म्हणाले, मी रोहिणी ताईंना भाजपमध्ये चला म्हणालो होतो, पण त्यांनी याला नकार दिला. त्या म्हणाल्या की, त्यांची पवार साहेबांच्या विचाराशी नाळ जुळली आहे. त्यांनी मला मान सन्मान दिला आहे. त्यांची तत्वे मला आवडतात त्यामुळे मी राष्ट्रावादीतच राहणार आहे.

गेल्या एक ते दिड महिन्यांपासून एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांच्या प्रवेशाला राज्यातील भाजप नेत्यांचा विरोध आहे असे बोलले जात आहे. यावर बोलताना खडसे म्हणाले, "माझ्या प्रवेशाला कोणाचाही विरोध नाही. पुढे मला आणि गिरीश महाजन यांना पक्षासाठी एकत्र काम करावे लागणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT