Eknath Khadse 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse: "लाव रे तो व्हिडिओ..."; खडसेंनी भरसभेत दाखवले फडणवीसांचे जुने VIDEO!

Sandip Kapde

Eknath Khadse: जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वाभिमान सभा पार पडली. या सभेत बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ लावत टीका केली. व्हिडिओ दाखवल्यानंतर सभेच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

"देवेंद्र फडणवीस यांनी कधीही आश्वासन पूर्ण केले नाहीत. आता व्हिडिओ बघितले ना… फडणवीस एकदम खोटारडा माणूस आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल खोटं बोलले. विदर्भ वेगळा झाला नाही तरी लग्न करणार नाही म्हटले होते. मात्र त्यांनी लग्न केले. आज मराठा समाजाला मूर्ख बनवण्याच काम सुरू आहे. सरकार भावनांशी खेळत आहे. तिघांच सरकार … एक सिनियर एक ज्युनियर … दोन बायका फजिती ऐका", अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.

अजित पवार बोलेल ते करणारा नेता. मात्र आता त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. क्या हालत बना दी …. आता तुमच्या सहीनंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांची सही. तुमचा स्वाभिमान गेला कुठे?, असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.

वापरा आणि फेकून द्या ही भाजपची निती आहे. याच मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला. लोक जमले पण अंगणवाडीचे… इतर कर्मचारी होते… काहींना हप्ते देऊन आणले… तुम्हाला हप्ते दिले का? तुम्ही कोणासाठी आलात… तुम्ही भविष्यातील पंतप्रधानासाठी आलात, असे एकनाथ खडसे म्हणाले.

खडसे म्हणाले म्हणाले, "राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केलं.ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ते मंत्री झाले. एका भ्रष्ट अधिकाऱ्यासाठी माझ्याविरोधात ठराव केला. आता खोक्यांमुळे माज आलाय… मस्ती आली आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT