Sharad Pawar Criticism CM Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Gulabrao Patil: भविष्यात कोणतेही गट एकत्र येऊ शकतात; शिंदे गटाचा भाजपला सूचक इशारा?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सध्या कोणत्या पक्षातील नेते दुसऱ्या कोणत्या पक्षात जातील याचा काही नेम उरला नाही. शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटाने सरकार स्थापन केलं. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहे. या दोन्ही गटांनी पूर्वीचा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर नवीन पक्ष स्थापन केले आहे. आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे गट एकत्र येण्याबाबत मोठं विधान केलं आहे.

याआधी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर सूचक विधान केलं होतं. त्यात त्यांनी भविष्यात शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात, असं म्हटलं होतं. आता पाटील यांनी एकत्र येण्याबाबत सुचक वक्तव्य करून भाजपला इशारा दिलाय का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येणार का, असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले की, भविष्यात कोणताही गट एकत्र येऊ शकतो.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे यांच्या पवार भेटीनंतर शिंदे गट आणि राष्ट्रवादीची भविष्यात युती होऊ शकते, असं विधान केलं होतं. मात्र केसरकर यांनी शरद पवार राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही सगळेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असतो. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT