Eknath Shinde and Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : 'हिऱ्यापोटी गारगोटी...'; म्हणत शिंदेची उद्धव यांच्यावर नाव न घेता जहरी टीका

सकाळ डिजिटल टीम

नागपूर - तब्बल दोन वर्षानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे. सुरुवातीला अधिवेशन आरोप-प्रत्यारोप आणि चौकशांनी गाजलं. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं. मात्र आज मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना, उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. (Eknath Shinde news in Marathi)

एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही रेशीमबाग येथे भेट दिली, त्यावरून राजकारण केलं गेलं. मला रेशीमकिडा म्हटलं गेलं. पण मी सांगू इच्छितो की, मी रेशीमबागेत गेलो, तुमच्यासारखा गोविंदबागेत नाही. आम्हाला म्हणतात, बाप चोरला. अहो बाळासाहेब आमच्यासाठी पितृतुल्यच आहेत. जन्म दिला नसला तरी त्यांनीच आम्हाला घडवलं. त्यामुळे त्यांच्या विचारांची प्रतारणा आम्ही कधीही केली नाही, असंही शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाच्या लालसेसाठी बाळासाहेबांचे विचार संपविण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी बाळासाहेबांना तुरुंगात टाकलं त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसले. बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले. शिंदे पुढं म्हणाले की, खुर्चीसाठी तुम्ही पाप केलं. एक म्हण आहे, 'हिऱ्यापोटी गारगोटी..', असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता जहरी टीका केली.

शिंदे पुढं म्हणाले की, उद्योग येण्यासाठी आणि जाण्यासाठी प्रिपरेशन असते, परवानग्या असतात. उद्योग बाहेर जाण्यासाठी जबाबदार कोण होते, हे सर्वंना ठावूक आहे. मी त्यावेळी पंतप्रधान मोदींना फोन लावला होता. तेव्हा मोदी म्हणाले की, शिंदेजी कोणताही मोठा उद्योग दोन-तीन महिन्यात इथून तिथं जात नसतो. तिथल्या सरकारकडून उद्योगांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना काय ठावूक होतं की, सरकार बदलणार? त्यामुळे ते उद्योग निघून गेले, असं मोदींनी आपल्याला सांगितल्याचं शिंदे सभागृहात म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT