महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : कामाख्या देवीच्या दर्शनानंतर CM शिंदे म्हणाले; आज खऱ्या अर्थाने...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - राज्याच्या सत्तांतराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांच्यासाठी वेगळंच आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे आमदार आणि खासदार सहकुटुंब आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत. दर्शनानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी संवाद साधला. (Eknath Shinde news in Marathi)

एकनाथ शिंदे म्हणाले की, आज कामाख्या देवीच दर्शन घेतलं. मनोभावे सर्वांनी दर्शन घेतलं. सर्वांना आनंद आहे. खऱ्या अर्थाने कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील संकट दूर व्हावं. शेतकऱ्यांसह सर्व घटकांना सुख-समाधान मिळावं यासाठी आम्ही आलोय. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या स्वागतासाठी तीन मंत्र्यांना पाठवलं होतं. आसामचे मुख्यमंत्री आणि आसाम सरकारचे धन्यवाद.

शिंदे पुढं म्हणाले की, आसाम सरकारचे आम्हाला सहकार्य लाभलं आहे. त्यांचे मी आभार मानतो. कामाख्य देवी आसाममध्येच आहे. देवीच्या आशीर्वादामुळे आसामच्या जनतेला सुख-समाधान मिळेल, असंही शिंदे यांनी म्हटलं.

हे ही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

गुवाहाटीला जाण्यापूर्वी शिंदे बोलताना म्हणाले होते की, कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत. आम्ही हे सर्व राज्यासाठी करत आहोत. राज्यातल्या बळीराजाला चांगले दिवस येऊ देत. राज्यातील जनता सुखी होऊ देत. राज्यावर आलेली संकट अनिष्ट दूर होऊ देत यासाठी आमचा प्रयत्न असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: बापरे! कोथरूडमध्ये रस्ता खचला, ट्रक फसला... व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची घुसखोरी! काँग्रेसला तिसरा झटका; थोपटे, धंगेकरांनंतर 'हा' माजी आमदार पक्षाला देणार सोडचिठ्ठी?

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्राचा अभिमान गणेशोत्सव आता अधिकृत राज्य महोत्सव!

iPhone 15 Price Drop: आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! iPhone 15 वर मिळतोय चक्क 12 हजारचा डिस्काउंट, इथे सुरु आहे सुपर ऑफर

कुणाला गद्दार म्हणतो, बाहेर ये तुला दाखवतो; विधानसभेत मंत्री देसाई आणि परब यांच्यात जुंपली, सभागृहात राडा

SCROLL FOR NEXT