Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

'एक दुजे के लिए' सिनेमाचा पडद्यावर झाला तसाच राजकीय अंत होईल - संजय राऊत

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना राऊतांनी टोला लगावला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार आणि सेनेच्या बंडखोर नेत्यांवर टीका केली आहे. शिवसेना सोडलेल्यांनी स्वतंज्ञ पक्ष तयार करावा, असा सल्लाही राऊतांनी दिला आहे. तसंच शिंदे फडणवीस सरकारचा राजकीय अंत लवकरच होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. (Sanjay Raut Criticizes Shinde Fadnavis Government)

संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बंडखोरांवर टीका करताना राऊत म्हणाले की, ज्यांनी शिवसेना सोडलेली आहे आणि शिवसेनेचा वापर करू नका. तुम्ही स्वतःचा स्वतंत्र पक्ष तयार करा. तुम्ही शिवसेना शिवसेना का करता? बाळासाहेब ठाकरे यांची ही खरी शिवसेना आहे. या शिवसेनेच्या पंखाखाली तुम्ही का जगता? तुम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडला असाल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र स्थान निर्माण करा. शिवसेनेचा गैरवापर करू नका.

राऊत पुढे म्हणतात, "हकालपट्टी करण्यात आलेले असे अनेक लोक आहेत जे शिवसेना भाजप युती असताना पराभूत झालेले आहेत, त्यांना भाजपचा पुळका आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेत काय खळबळ माजली आहे हे आम्हाला माहित आहे आणि त्यावर स्पष्ट सांगतो. पण ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्ष हद्दपार आहेत. आमदार आणि खासदार हे पराभूत झाल्याचा इतिहास आहे.

शिंदे फडणवीस ( Eknath Shinde-Devendra Fadnavis) सरकारवरही संजय राऊतांनी टीका केली आहे. मंत्रिमंडळावरुन टीका करताना संजय राऊत म्हणाले,"इतके दिवस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मंत्रिमंडळ होऊ शकत नाही. नवीन सिनेमा राजकारणात सुरू आहे. 'एक दुजे के लिए' पडद्यावर त्याचा अंत जसा झाला, राजकीय अंत सुद्धा त्याच पद्धतीने होईल. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी राजकीय आत्महत्या केली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT