CM Eknath Shinde Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

आता जागेवरच कामं होतील! 'फोन पॅटर्न'बाबत CM शिंदेंचं उत्तर

'पावसाळ्यात निवडणूक घेणे अशक्य आहे. पावसामुळे मर्यादा आहेत.'

सकाळ डिजिटल टीम

'पावसाळ्यात निवडणूक घेणे अशक्य आहे. पावसामुळे मर्यादा आहेत.'

पंढरपूर : राज्यातील पूरग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांना मदतीचे आदेश देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) फोन हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पूरग्रस्तांना मदत पुरवण्याबाबत तातडीने कारवाई करा, स्वत: लक्ष द्या, असे आदेश शिंदेंनी दिले होते. फोनवरुन आदेश देतानाची शिंदेंची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाले असून या ‘शिंदे पॅटर्न’बाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलंय.

आज (रविवार) सकाळी पंढरपूर (Pandharpur) येथे पत्रकारांनी सरकारी कामकाजाचा पॅटर्न बदलणार का, असा प्रश्न विचारला. यावर शिंदे म्हणतात, राज्यात सर्वसामान्यांचं राज्य आहे. आता कोणावरही अन्याय होणार नाही. तसेच कोणी वंचितही राहणार नाही. आता फाईल लालफितीत अडकणार नाही. जागेवरच काम होतील. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारं सरकार आहे.

आता लिखाण काम बंद होईल. तपास करुन अहवाल देण्याच्या प्रक्रियेत वेळ जातो. आता थेट फोन करुन जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाही करा असे आदेश देणार, असं एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी सांगितले होते. दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी हे प्रत्यक्षात आणल्याचे दिसले. दिल्लीत पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्याशी भेटीगाठी सुरू असताना शिंदेंनी प्रवासादरम्यान कारमधून थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन केले होते. पूरगस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी फोन केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती करणार

राज्यातील नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचे शिंदेंनी सांगितले. पावसाळ्यात निवडणूक घेणे अशक्य आहे. पावसामुळे मर्यादा आहेत. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून अशा परिस्थितीत सर्व यंत्रणा पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वापरावी लागते. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलावी अशी विनंती आयोगाला विनंती करणार आहोत, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT