Eknath SHinde and Uddhav Thackeray
Eknath SHinde and Uddhav Thackeray  Sakal
महाराष्ट्र

Party Symbol : ठाकरेंनंतर शिंदे गटाकडूनही निवडणूक आयोगाला नावांची यादी सुपूर्द

सकाळ डिजिटल टीम

Eknath Shinde News : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून नव्या चिन्हांची आणि नावे शोधली जात आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाकडून तीन नावांची आणि तीन चिन्ह आयोगाला पाठवली होती. त्यानंतर आज शिंदे गटाकडून तीन नावांची यादी निवडणूक आयोगाला पाठवण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही गटाकडून देण्यात आलेल्या नावांमध्ये बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता नेमकं काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिंदे गटाकडू आयोगाला पाठवण्यात आलेल्या नावांमध्ये बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची या नावांचा समावेश करण्यात आला आहे. तर, काल ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन नावं आयोगाला पाठवली आहेत.

उद्धव ठाकरेंकडून ठाकरे गटासाठी त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल या चीन चिन्ह निवडण्यात आली आहे तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा ही चिन्हं दिली आहेत. आता या दोन्हीत फक्त गदा आणि मशाल ही दोनच दोघांची वेगळी चिन्हं आहेत.

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे हायकोर्टात 

अंधेरीमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील वाद शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणत्याही गटाला वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने आता हायकोर्टाचे दार ठोठावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT