Sanjay Shirsat esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Shirsat |वर्षावरील स्नेहभोजनाचे निमंत्रण शिरसाटांनी नाकारलं? म्हणाले, 'शिंदेंनी...'

आज वर्षा बंगल्यावर शिंदे गट आणि भाजपच्या मंत्री आणि आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आल आहे.

धनश्री ओतारी

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी शिंदे गटाच्या आमदारांना स्नेह भोजनासाठी निमंत्रित केल्या गेले आहे. वर्षा बंगल्यावर बाप्पांचे आगमन झाले आहे. त्यानिमित्त्याने मुख्यमंत्र्यांनी भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. लवकरच शिंदे गटाचा पहिला मेळावा होणार आहे. मात्र, आमदार संजय शिरसाट जाणार नसल्याने चर्चेला उधाण आलं आहे. राजकीय वर्तुळा अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र, शिरसाट यांनी यावर स्पष्टिकरण देत चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.(eknath shinde invited politicians Sanjay Shirsat at his residence for ganesh darshan)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. गणेशोत्सवानिमित्त राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदाच वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. त्यांनी सर्व आमदारांना निमंत्रण दिले आहे. यामध्ये भाजप आमदारांचादेखील सहभाग आहे. दरम्यान, नाराज असलेले शिरसाट जाणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशातच त्यांनी खुद्द माध्यमांशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

वर्षा बंगल्यावर जाणार की नाही; शिरसाट म्हणाले...

मी नाराज नाही, दोनदिवसांपूर्वी, शिंदेंच्या बंगल्यावर गेलो होते. त्यांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतलं. मतदारसंघात काही कार्यक्रम असेल ना. तर पुर्वपरवानगी घ्यावी लागते. ती परवानगी मी त्यांच्याकडून घेतली आहे. त्यांनी कार्यक्रमांना परवानगी दिली नसती तर मी त्यांच्या घरी स्नेहभोजनासाठी नक्की गेलो असतो.

शिंदेंचा कार्यक्रम हा माझा कार्यक्रम अस मी मानतो. मी गेलो नाही म्हणून काही मोठं घडेलं अस काही नाही. कृपया चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नको. अशा शब्दात त्यांनी प्रत्रकारांना सुनावले.

मी नाराज नाही. माझ्यासाठी नाराजी नाट्य संपलं आहे. जो निर्णय शिंदे घेतील तो मला मान्य आहे. असे स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिला.

शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल या अपेक्षेने अनेक जण मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लावून होते. त्यात ९ ऑगस्टला राज्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र त्यात नाव नसल्याने शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या विस्तारात स्थान मिळेल याच अपेक्षेवर शिरसाट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT