Raj Tahckeray Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

शिंदे गट मनसे सोबत जाणार? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून शिंदे गट मनसेसोबत जाणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

दत्ता लवांडे

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला बंड केलं आणि राज्यात राजकीय नाट्याचा थरार सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात तब्बल ३९ शिवसेनेचे आमदार आहेत. शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी ३९ आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे.

(Maharashtra Politics Updates)

शिंदे गटाला एखाद्या पक्षात विलिनीकरण करावे लागणार आहे. नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते असं शिवसेनेच्या वकिलांनी सांगितलं आहे. पक्षांतरबंदी कारवाईपासून वाचवायचं असेल तर एकूण संख्याबळापैकी दोन तृतीयांश संख्या गटाला आवश्यक असते पण तो गट एखाद्या पक्षात विलिनीकरण करावा लागतो नाहीतर बहुमत असतानाही कारवाईला सामोरे जावं लागणार आहे असं शिवसेनेचे वकील म्हणाले होते.

यानंतर आता शिंदे गटाकडे भाजप किंवा प्रहार पक्ष हे दोन पर्याय आहेत असं बोललं जातंय. पण त्यानंतर शिंदे गट मनसेत सामील होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. शिंदे गट हा मनसेत सामील होणार आहे कारण मनसे हीसुद्धा शिवसेनेतून बाहेर पडून स्थापन झाली आहे अशा चर्चा सध्या माध्यमांत पसरू लागल्या आहेत पण यासंदर्भात शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

"आम्हाला कोणत्याच गटात सामील होण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही शिवसेनेचा भाग आहोत. आमचा हा मूळ शिवसेनेचाच गट आहे पण जे उरलेले १४ आमदार आहेत त्यांनी कोणत्या गटात जायचं ते ठरवावं. आम्हाला कोणत्याच पक्षात जायची गरज नाही आमचा मूळ पक्ष हा शिवसेनाच आहे. उरलेल्या १४ लोकांनीही आमच्याच गटात यावं, कारण आम्ही सगळे शिवसेनेला मानतो, ते आमच्याकडे आले तर त्यांना नक्कीच फायदा होईल." असं ते म्हणाले.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर जाहीर टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी आम्ही शिवसेनेचाच वेगळा गट करण्यावर ठाम असल्याचं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT