Eknath Shinde, Uddhav Thackeray and Narendra Modi
Eknath Shinde, Uddhav Thackeray and Narendra Modi 
महाराष्ट्र

Eknath Shinde : खुद्द मोदींनी मला सांगितलेलं कोणताही उद्योग...; 'फॉक्सकॉन'वर शिंदेंचं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेना पक्षात बंड करून एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. शिवाय भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीही झाले. मात्र शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच, महाराष्ट्रातील काही उद्योग गुजरात राज्यात गेले. त्यामुळे शिंदे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र आज शिंदे यांनी उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्यावर आधीच्या सरकारला जबाबदार धरलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्याला उद्योग बाहेर जाण्याबाबतच कारण सांगितल्याचं ते म्हणाले. (Eknath Shinde news in Marathi)

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही घेणारे नाही, देणारे आहोत. आमच्याकडे देना बँक आहे. उद्योगाच्या उपसमितीची बैठक आधीच्या काळात १७ ते १८ महिने घेतली गेली नाही. सगळे लोक म्हणतात, महाराष्ट्रातील उद्योग पळवले जातात, अशी आवई उठवत आहेत. मला सांगा दोन तीन महिन्यात एखादा उद्योग येतो आणि जातो, असं कधी होत का, असा प्रश्न शिंदे यांनी विरोधकांना विचारला.

शिंदे पुढं म्हणाले की, उद्योग येण्यासाठी आणि जाण्यासाठी प्रिपरेशन असते, परवानग्या असतात. उद्योग बाहेर जाण्यासाठी जबाबदार कोण होते, हे सर्वंना ठावूक आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी मी त्यावेळी पंतप्रधान मोदींना फोन लावला होता. तेव्हा मोदी म्हणाले की, शिंदेजी कोणताही मोठा उद्योग दोन-तीन महिन्यात इथून तिथं जात नसतो. तिथल्या सरकारकडून उद्योगांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना काय ठावूक होतं की, सरकार बदलणार? त्यामुळे ते उद्योग निघून गेले, असं मोदींनी आपल्याला सांगितल्याचं शिंदे सभागृहात म्हणाले.

मी खरच पंतप्रधानांना फोन केला होता. ही बाब तुमच्या डोक्यावरून जावू देऊ नका, असा टोलाही यावेळी शिंदे यांनी काँग्रेस आमदार नाना पटोले यांना लगावला.

हेही वाचा जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT