Kesarkar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या मंत्रीपदाबाबत दीपक केसरकरांचे मोठं विधान ; म्हणाले, 'त्यांना...'

सकाळ डिजिटल टीम

Deaapak Kesarkar On Bacchu Kadu : शिंदे- फडणवीस सरकारचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार झालं असून, शिंदे गाटातील 9 जणांना कॅबिनेट पद देण्यात आले आहे. विस्तारानंतर काल पहिल्यांदाच कॅबिनेटची विस्तारित मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यानंतर मंत्रालयात जाण्यापूर्वी आज शिंदे गटातील शपथ घेतलेले सर्व मंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी खाते वाटप कधी होणार याबाबत भाष्य केलं आहे.

केसकर म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार दोन दिवसांपूर्वी करण्यात आला असून, आज संध्याकाळपर्यंत खाते वाटप होऊ शकते असे विधान त्यांनी केले आहे. जी जी खाती आम्हाला दिली जातील त्याचा पदभर आम्ही स्वीकारू असे केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, हा पदभार स्वीकारण्यापूर्वी बाळासाहेबांचे दर्शन घेणं हे आमच्या सर्वांसाठी आवश्यक होतं. कारण त्यांच्याच प्रेरणेनं महाराष्ट्राचा विकास कारायचा आहे.

विकासादरम्यान, बाळासाहेबांचे विचार आम्हाला कायम प्रेरणा देत राहतील. बाळासाहेबांना जे जे अपेक्षित होते महाराष्ट्रातील जनतेसाठी ते ते करून दाखवण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करू. ज्यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी आम्ही सर्वच्या सर्व 5 आमदार भर पावसात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी आलो होतो अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा; महागाई भत्त्यात वाढ, १ जानेवारीपासूनचा फरक मिळणार

Nida Khan: निदा खानला १४ दिवसांची कोठडी; एसआयटीकडून आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू, ‘पॉश’ कायद्याचे उल्‍लंघन..

Pune Airport: पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलसाठी ऑगस्टची प्रतीक्षा: सुरक्षा उपकरणे उपलब्ध नाहीत, ५०० प्रवाशांच्या बसण्याची सोय हाेणार!

Annasaheb Pathare : क्रीडा क्षेत्रावर शोककळा; ज्येष्ठ कुस्तीसंघटक अण्णासाहेब पठारे यांचे निधन

जीवनमान-जीवनभान : हृदयविकार आणि व्यायाम

SCROLL FOR NEXT