एकनाथ शिंदे गुगल
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना घाबरलेली नाही, ED मार्फत त्रास योग्य नाही - एकनाथ शिंदे

कॉंग्रसमध्ये कुठेही नाराजी नसून पक्षातील कोणीही नेतेमंडळी नाराज नाहीत - शिंदे

स्नेहल कदम

कॉंग्रसमध्ये कुठेही नाराजी नसून पक्षातील कोणीही नेतेमंडळी नाराज नाहीत - शिंदे

मागील दोन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, खासदार राऊत यांच्यावर भाजपाने अनेक आरोप केले आहेत, यावर प्रतित्युर म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, आता मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas aaghadi) जेव्हा तयार झाली, तेव्हा संजय राऊत प्रमुख होते. त्यांना टार्गेट करणे योग्य नाही, असे त्यांनी खडसावून सांगितले आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या टीकेवर ते म्हणाले, शिवसेना घाबरलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणा माध्यमातून असा त्रास योग्य नाही. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होती, म्हणून मी तिकडे होतो. कॉंग्रसमध्ये (Congress) कुठेही नाराजी नाही. पक्षातील कोणीही नेतेमंडळी नाराज नाहीत. काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक आहे. त्यामुळे विरोधकांनी उगाच चर्चांना उधाण आणू नये, असे म्हणत त्यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत.

बेलापूर जेट्टी येथील वॉटर टॅक्सी या यासंदर्भात ते म्हणाले, गेली अनेकवर्ष प्रतिक्षेत असलेल्या या जेट्टीचे लोकापर्ण होत आहे. ही एक चांगली सुरूवात आहे. इतर देशातमध्येही अशा प्रकारे वॉटर टॅक्सी वापरली जाते. नवी मुंबई ते भाऊचा धक्का असा आपला पहिला टप्पा सुरू होत आहे. तिकिटाचे दर किफायतशीर आहेत. भविष्यात नागरिकांच्या ज्या सूचना येतील त्यानुसार बदल केले जातील. आधी प्रवास तरी सुरू होऊ द्या, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT