Eknath Shinde on Ravi Rana ESakal
महाराष्ट्र बातम्या

Ravi Rana Statement: लाडकी बहीण योजनेवरून सहकाऱ्यांनी अकलेचे तारे तोडले, वाचाळ आमदारांना भाईंनी बैठकीतूनच दम दिला

Eknath Shinde on Ravi Rana: रवी राणांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महायुतीतील आमदारांना दम दिल्याचे पाहायला मिळाले आहे. वाचा नेमकं काय म्हणाले?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिसून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता यावर प्रतिक्रिया देत आमदारांना दम दिला आहे. प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोलण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्या आहेत. अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारच्या योजनांवरती परिणाम होत असल्याचेही ते म्हणाले.

आज महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवर एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद या बैठकीत दिसून आले. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून बोला. वादग्रस्त वक्तव्यांचा विरोधकांना फायदा होत आहे. त्यामुळे सर्वांनी विचार करुन बोलावे. केबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीणबाबत बोलताना अपप्रचार होईल, असे विधान करू नका.

एकनाथ शिंदे म्हणाले की, रवी राणा यांच्यासारखे आमदार ज्याप्रकारे भाष्य करतात ते चुकीचे आहे. लोकांमध्ये याबाबत गैरसमज पसरवणाऱ्या आमदारांना वेळीस तंबी द्या. लाडकी बहीण योजनेबाबत चांगला प्रचार करा, असं ते म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आमदारांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच मित्रपक्षांनाही त्यांच्या आमदारांना असे वक्तव्य करण्यावर आळा घालण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेचा सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. जनतेतून या योजनेचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT